
दूध जळण्याने काय होतं
वास्तुशास्त्रात दैनंदिन कामांबाबत अनेक उपयुक्त गोष्टी सांगितल्या आहेत. याशिवाय त्यांचे शुभ-अशुभ परिणामही सांगितले आहेत. त्याचप्रमाणे धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवसाबाबत काही नियम सांगितले आहेत. याशिवाय कोणत्या गोष्टी शुभ आणि अशुभ आहेत हेदेखील सांगितले आहेत. आज आपण अशाच काही घटनांबद्दल जाणून घेऊया ज्या दुधाशी संबंधित आहेत.
बरेचदा घरात लक्ष नसताना दूध जळतं किंवा सांडतं. ही आपल्या घरातील कॉमन आणि बऱ्यापैकी घडणारी गोष्ट आहे. मात्र वास्तुशास्त्राप्रमाणे दूध जळणे वा सांडणे हे शुभ की अशुभ हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्र पाहणाऱ्या दीपा प्रभू यांनी याबाबत काही खुलासा केलाय. (फोटो सौजन्य – iStock)
वास्तुशास्त्रानुसार अर्थ
दूध सांडणे किंवा जाळणे हे वास्तुशास्त्रानुसार चांगले मानले जात नाही. जर दूध पुन्हा पुन्हा सांडत असेल तर ते देवी लक्ष्मीच्या नाराजीचे हे लक्षण आहे. यामुळे घरात प्रचंड आर्थिक नुकसान आणि गरिबी दर्शवते. तसंच भविष्यात उद्भवणाऱ्या काही संकटांच्या आगमनाबद्दलदेखील तुम्हाला हा सूचक इशारा आहे.
हेदेखील वाचा – Weekly Horoscope: वृश्चिक राशीच्या व्यक्तींना पडेल एक चूक महागात, या आठवड्यात सांभाळा
अशुभ मानले जाते
सतत दूध जळणे अशुभ
दूध सांडल्याप्रमाणे दूध जाळणेदेखील चांगले नाही. हे अशुभ मानले जाते. अशा घटना अधूनमधून घडत असतील तर हरकत नाही, पण दूध सांडत असेल किंवा पुन्हा पुन्हा जळत असेल तर काळजी घ्या, नाहीतर वाईट दिवस सुरू व्हायला वेळ लागणार नाही. तुम्ही याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते
बुधवारचा दिवस हानिकारक
ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारी दूध जळणे फार अशुभ आहे. त्यामुळे नोकरी किंवा व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते. पैशाचा ओघ रोखला जातो. त्यामुळे बुधवारी विशेष काळजी घ्या. या दिवशी ज्यामध्ये दूध जाळण्याची शक्यता असते असे खीर किंवा असे कोणतेही गोड पदार्थ न करणे चांगले ठरेल.
हेदेखील वाचा – Guru Nakshatra Transit: 31 जुलैपासून 5 राशींचा वाढणार बँक बॅलन्स, पडणार पैशांचा पाऊस
बुधवारी करू नका ही कामं
आर्थिक नुकसान, करिअरच्या प्रगतीत अडथळा, व्यवसायात नुकसान इत्यादी टाळण्यासाठी बुधवारी इतर काही गोष्टी लक्षात ठेवा. यासाठी काही कामं करणं टाळा