फोटो सौजन्य- pinterest
उद्या 1 जून नवीन महिना सुरु होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जूनचा पहिला दिवस खूप खास आहे. कारण रविवारी चंद्र आपल्या राशीत बदल करत आहे. वैदिक पंचांगानुसार, 1 जून रोजी रात्री 9.36 वाजता चंद्र कर्क राशी सोडून चंद्र राशीत प्रवेश करणार आहे.
या महिन्यात, ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य आपल्या मित्र ग्रह बुधच्या मिथुन राशीत प्रवेश करेल. याशिवाय बुध, मंगळ आणि शुक्र हे देखील वेगवेगळ्या तारखेला त्यांची राशी बदलतील.
शास्त्रांमध्ये, चंद्राला भावना, विचार आणि मानसिक शांतीचा कर्ता मानले जाते, जो दर दोन दिवसांनी राशीत संक्रमण करतो. तर सिंह राशीचा स्वामी सूर्य देव आहे, जो ग्रहांचा राजा आहे, ज्याचे प्रतीक सिंह आहे. या राशी बदलाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी जून महिन्याचा पहिला दिवस अज्ञात भीती किंवा मानसिक अशांतता जाणवू शकते. छोट्या छोट्या गोष्टींवरून तणाव वाढू शकतो आणि मन अस्वस्थ राहू शकते. कौटुंबिक जीवनातही काही गुंतागुंत निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे घरातील वातावरण काही काळासाठी अस्थिर होऊ शकते.
जून महिन्याच्या पहिल्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. जर तुमच्या प्रेम जीवनात समस्या येत असतील तर त्याही दूर होतील. याशिवाय, गेल्यावर्षी 2024 मध्ये केलेली गुंतवणूक 2025 मध्ये नफा देण्यास सुरुवात करेल. ज्या लोकांना नोकरी बदलायची आहे त्यांना चांगली संधी मिळेल. तसेच या लोकांनी करिअर संबंधित कोणताही निर्णय घेताना काळजी घ्यावी.
चंद्र सिंह राशीत प्रवेश करत असल्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांच्या नातेसंबंधात स्थिरता येईल. विवाहित लोकांचे त्यांच्या जोडीदारासोबत भावनिक बंधन वाढेल. या महिन्यात तुमच्या घरात शांती असेल अशी आशा आहे. याशिवाय, आर्थिक बाबींमध्ये स्थिरता येईल आणि बचत वाढेल. तुम्ही गाडी खरेदी करु शकता.
चंद्राच्या सिंह राशीत प्रेवश करत असल्याने मीन राशीच्या लोकांना सर्जनशील कामात यश मिळेल आणि घरगुती समस्या संपतील. विवाहित लोकांच्या कौटुंबिक जीवनात सुरू असलेला तणाव कमी होईल आणि नातेसंबंधांमध्ये जवळीक निर्माण होईल. धार्मिक यात्रेवर जाण्याची योजना आखू शकतात. या महिन्यात त्यांच्या आर्थिक बाबींबद्दल विशेषतः सावधगिरी बाळगावी लागेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)