
फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांच्या हालचालींचा जीवनावर होणारा परिणाम खोलवर होणारा आहे. ज्यावेळी काही ग्रह एकत्रित येऊन विशेष संयोजन तयार करतात त्यावेळी त्याचा परिणाम थेट व्यक्तीच्या नशीब, संपत्ती आणि करिअरवर होताना दिसून येतो. या महिन्यातील 20, 21 आणि 22 तारीख ही खूप खास मानली जाणार आहे. या तीन दिवशी दोन महत्त्वाची युती तयार होत आहे. ज्यामुळे ते एकमेंकासमोर येत आहे. यामुळे त्यांचा प्रभाव आणखी वाढतो. या काळात चंद्र धनु राशीत प्रवेश करतो आणि मंगळासोबत एकत्रित होऊन चंद्र मंगळ योग तयार करतो. ज्यावेळी मिथुन राशीमध्ये स्थित असलेला गुरु चंद्राकडे जातो त्यावेळी गजकेसरी राजयोग तयार होतो. विशेष म्हणजे हा योग केवळ एक किंवा दोन राशींसाठीच नाही तर सहा राशींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रानुसार, या तीन दिवसांत केलेले काम यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. नोकरी, व्यवसाय, आर्थिक गुंतवणूक, मालमत्तेचे निर्णय आणि नातेसंबंधांशी संबंधित प्रयत्नांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला राहणार आहे. तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. तुमचा सन्मान देखील वाढेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित फायदा होऊ शकतो. बेरोजगार व्यक्तींना देशात किंवा परदेशात चांगल्या संधी मिळू शकतात.
मिथुन राशीच्या लोकांसाठी भागीदारी आणि कामाच्या बाबतीत हा काळ खूप शुभ राहील. नोकऱ्यांची मागणी वाढेल आणि चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतील. तुम्हाला सामाजिक मान्यता मिळेल आणि प्रभावशाली लोकांशी संपर्क येईल.
सिंह राशीच्या लोकांसाठी हा योग सामान्य राहणार आहे. या काळात शिक्षण, मुले आणि सर्जनशील कार्यात फायदा होईल. नोकरीत स्थिरता वाढेल आणि प्रयत्न यशस्वी होतील. व्यवसायात नफा वाढेल. घर किंवा वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात.
धनु राशीच्या लोकांसाठी हा योग शुभ असणार आहे. या काळात तुमच्यावरील प्रभाव सर्वात जास्त राहणार आहे. उत्पन्न अपेक्षेपेक्षा जास्त वाढू शकते. कामावर तुमचा प्रभाव वाढेल आणि तुम्हाला मान्यता मिळेल. विवाह, व्यवसाय आणि मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये शुभ संकेत दिसतील. जुने वाद मिटू शकतात.
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल राहणार आहे. या काळात उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. नोकरीत प्रगती आणि व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच केलेले प्रयत्न यशस्वी होतील आणि आत्मविश्वास वाढेल.
मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप अनुकूल राहणार आहे. या राशीच्या लोकांना हा काळ करिअरच्या दृष्टीने अनुकूल राहणार आहे. नोकरीच्या जागा आणि पगार वाढू शकतात. बेरोजगार व्यक्तींना चांगल्या ऑफर मिळतील. आर्थिक आणि कौटुंबिक समस्या दूर होतील. मालमत्तेच्या बाबतीमध्ये तुम्हाला अपेक्षित लाभ होऊ शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: चंद्र आणि मंगळ एकत्र किंवा परस्पर केंद्र/त्रिकोणात आल्यावर चंद्र–मंगळ योग तयार होतो. हा योग धन, साहस, निर्णयक्षमता आणि कार्यसिद्धीचा कारक मानला जातो.
Ans: चंद्रापासून गुरु केंद्रात (1, 4, 7, 10) असला की गजकेसरी योग बनतो. हा बुद्धिमत्ता, मान-सन्मान, स्थैर्य आणि समृद्धी देणारा योग आहे.
Ans: चंद्र–मंगळ योगाची कृतीशील ऊर्जा आणि गजकेसरी योगाची शहाणपणाची कृपा एकत्र आल्याने परिणाम अधिक प्रभावी ठरतात. त्यामुळे कमी कालावधीत मोठे लाभ संभवतात.