फोटो सौजन्य- istock
दिवाळी पाडवा म्हटलं की रोषणाई, प्रकाश आणि दिव्याच्या सणाचा एक वेगळाच उत्साह आपल्याला दिसून येतो. नवरा बायकोच्या नात्याचा हा खास दिवस. दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी काही खास संदेश जाणून घ्या
हिंदू धर्मांत कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीपासून कार्तिक महिन्यात शुक्ल पक्षाच्या द्वितीयेपर्यंत दिवाळी साजरी केली जाणार आहे. अंधारावर प्रकाशाच्या विजयाशी संबंधित या सणाबाबत विविध धर्मांमध्ये वेगवेगळ्या समजुती आहेत. लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दिवाळी पाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सोने खरेदी, सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक कारणांसाठी या दिवसांचे विशेष महत्त्व आहे.
यंदा शनिवार, 2 नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडव्याच्या सण साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी सुवासिनी पतीचे औक्षण करतात. यामुळे पतीला दीर्घयुष्य लाभते, अशी श्रद्धा आहे. याशिवाय या दिवशी सोने खरेदी करणं शुभ मानले जाते. यादरम्यान दिवाळी पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा सणांच्या सोशल मीडियांच्या माध्यमातून शुभेच्छा देतात.
पाडव्याच्या शुभेच्छा संदेश
स्नेहाचा सुगंध दरवळला
आनंदाचा सण आला
विनंती आमची परमेश्वराला
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
हेदेखील वाचा- शुक्राच्या शुभ दृष्टीमुळे होईल या लोकांच्या उत्पन्नात वाढ
साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे!
उत्तम दिनाचे महात्म्य आहे!
सुखद ठरो हा छान पाडवा, त्यात असूदे अवीट गोडवा!
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आज बलिप्रतिपदा, दिवाळीचा पाडवा.
राहो सदा नात्यात गोडवा.
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
धनाचा होवो वर्षाव
सर्व ठिकाणी होवो तुमचं नाव
मिळो नेहमी समृद्धी अशी
होवो खास तुमची आमची दिवाळी
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा...
हेदेखील वाचा- भाऊबीज, छठपूजेपासून ते देवूथनी एकादशीपर्यंत, नोव्हेंबरमध्ये सणांची भरभराट, उपवास आणि सणांची संपूर्ण यादी जाणून घ्या
आज बलिप्रतिपदा
दिवाळीचा पाडवा
राहो सदा नात्यात गोडवा
आपण सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा,
दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा,
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना मनःपूर्वक शुभेच्छा!
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन आली आज दिवाळी
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी उजळेल आयुष्याची वहिवाट
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
दिव्याच्या तेजाने आसमंत उजळू दे,
सोनपावलांनी सुखसमृद्धी येऊ दे
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात
सदैव गोडवा यावा!
सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो!
थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो!
एकात्मतेचे लेणं लेऊया..
भिन्न-विभिन्न असलो तरी..
मनाने एक होऊया..
पाडवा व बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा!
तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या नात्यासाठी पाडवा हा खास
पाडवा व बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात
सदैव गोडवा यावा!
सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो!
थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो!
पाडवा व बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा