
फोटो सौजन्य- pinterest
प्रत्येक महिन्याच्या शुद्ध पंधरवड्याच्या आठव्या दिवशी देवी दुर्गेची पूजा केली जाते. या दिवशी देवी दुर्गेची भक्तीभावाने पूजा केली जाते. दुर्गा अष्टमीचे व्रत देखील पाळले जाते. या व्रताला मासिक दुर्गा अष्टमी असेही म्हणतात. असे मानले जाते की जो कोणी हे व्रत पाळतो त्या व्यक्तीला त्याच्या सर्व कामामध्ये अपेक्षित यश मिळते.
मासिक दुर्गा अष्टमीला उपवास आणि पूजा करणाऱ्यांवर देवी विशेष आशीर्वाद देते. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने तिच्या कृपेने घरात समृद्धी येते. सर्व दुःख आणि संकटे दूर होतात. देवी दुर्गेचा आशीर्वाद सदैव राहतो. तर, मार्गशीर्ष महिन्यातील दुर्गा अष्टमी कधी साजरी आहे, पूजेचा शुभ मुहूर्त, पद्धत आणि महत्त्व जाणून घेऊया.
पंचांगानुसार, मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीची सुरुवात शुक्रवार, 28 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 12.29 वाजता या तिथीची सुरुवात होणार आहे. अष्टमी तिथीची समाप्ती शनिवार, 29 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 12.15 वाजता होणार आहेरात्रीच्या वेळी दुर्गा देवीची पूजा केली जाते. म्हणून मार्गशीर्ष महिन्यातील दुर्गा अष्टमी 28 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे.
मासिक दुर्गा अष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्व आवरुन झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा. नंतर तुमच्या घरातील देव्हारा स्वच्छ करा. तुमच्या हातात गंगाजल, तांदूळ आणि फुले घ्या आणि उपवास आणि पूजा करण्याचे व्रत करताना देवी दुर्गेचे ध्यान करा. नंतर चौरंगावर लाल रंगांचे वस्त्र पसरवून त्यावर दुर्गा देवीची मूर्ती किंवा चित्र ठेवावी. तसेच शक्य असल्यास कलश देखील ठेवावा. देवी दुर्गेला लाल रंगांचे वस्त्र, रोळी, कुंकू, तांदूळ, लाल फुले, हार, धूप, दिवे आणि नैवेद्य इत्यादी गोष्टी अर्पण कराव्यात.
त्यासोबतच देवीला अलंकाराच्या वस्तू अर्पण कराव्यात. शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि माँ दुर्गा मंत्रांचा जप करा. दुर्गा चालीसा किंवा दुर्गा सप्तशतीचे पठण करा. लाल कापडाने झाकलेल्या स्वच्छ व्यासपीठावर देवी दुर्गेची मूर्ती किंवा चित्र ठेवा. त्यानंतर कलशाची स्थापना करावी. नंतर मासिक दुर्गाष्टमी व्रताची कथा वाचावी आणि ऐकावी. पूजेनंतर देवीची आरती करुन घ्यावी. शक्य असल्यास या दिवशी 2 ते 10 वयोगटातील मुलींना जेवण द्या.
मासिक दुर्गा अष्टमीचे व्रत केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. यावेळी देवी दुर्गा शत्रूंचा नाश करते आणि भक्तांना भीतीपासून मुक्त करते. या व्रतामुळे आध्यात्मिक प्रगती आणि शांती मिळते. हे व्रत केल्याने जीवनात आनंद आणि शांती येते, संपत्ती, समृद्धी आणि सौभाग्य वाढते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: मासिक दुर्गाष्टमी 28 नोव्हेंबर रोजी आहे
Ans: मासिक दुर्गाष्टमीची सुरुवात 28 नोव्हेंबर रोजी होत असून त्याच दिवशी देवीची पूजा केली जाणार आहे
Ans: दुर्गाष्टमीला गोड पदार्थ, खीर, लाडू , फळ, नारळ, पंचामृत आणि लाल फुले