फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक असलेला दसरा सणाला विशेष महत्त्व आहे. दुसरं विशेष म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. दरवर्षी अश्विन शुक्ल महिन्यातील दशमी तिथीला सर्वत्र दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी प्रभू श्री रामांनी रावणावर विजय मिळवला होता. त्यामुळे आजही दसऱ्याच्या दिवशी रावण दहन केला जातो. यालाच वाईटावर केलेल्या विजयाचे प्रतीक मानले जाते.
या दिवशी शारदीय नवरात्रीची सांगता होते. जे भक्त नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतात. त्या उपवासाची या दिवशी पूर्णाहुती होते. दसऱ्याच्या दिवशी शस्त्राची पूजा केली जाते. यावर्षी नक्की दसरा कधी आहे. २० की २१ ऑक्टोबर, रावण दहनासाठी मुहूर्त कोणता आहे जाणून घेऊया..
अश्विन शुक्ल पक्षातील दशमी तिथीची सुरुवात मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी दुपारी १२.५० मिनिटांनी होणार आहे आणि या तिथीची समाप्ती २१ ऑक्टोबर रोजी दुपारी २.११ मिनिटांनी होणार आहे.
प्रदोष व्रत, विजय मुहूर्त बघता मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी रावण दहन करणे शुभ मानले जाईल. त्यामुळे दसऱ्याचा सण मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल. हे पंचांगानुसार दिसते.
दसऱ्याच्या दिवशी विजय मुहूर्त २० ऑक्टोबर रोजी दुपारी १.५९ ते २.४५ पर्यंत आहे. दुपारी पूजा करण्याचा मुहूर्त १.१० ते ३.३० यावेळी श्रवण नक्षत्राची सुरुवात होणार आहे. १९ ऑक्टोबर रोजी ३.३८ मिनिटांनी होईल. नक्षत्र समाप्ती २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.२ वाजता होईल. यावेळी प्रदोष मुहूर्त २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.४७ वाजता असेल. दसऱ्याच्या दिवशी रावण दहन प्रदोष काळात केले जाते. त्यामुळे ते ५.४७ नंतर करणे योग्य मानले जाईल.
दसऱ्याला विजयादशमी देखील म्हटले जाते. हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. या दिवशी शारदीय नवरात्रीची सांगता होते आणि प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला होता. यामुळेच वाईटावर विजयाचे प्रतीक मानले जाते.
विजयदशमीचा अर्थ आहे ‘विजयाची दशमी’ याचा अर्थ असा होतो की असत्यावर सत्याचा विजय. या दिवशी केले जाणारे रावण दहनाचा अर्थ आहे वाईटाचे दान करणे. रावणाचे दहा डोके हे नकारात्मक गुणांचे प्रतीक मोते आणि त्याच्या पुतळ्याचे दहन म्हणजे वाईट शक्तीचे दहन आहे.
वाईटांवर चांगल्या गुणांचे प्रतीक असलेला दसरा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. जो की देशातच नाही तर पूर्ण जगात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
शस्त्रपूजेची ही महान परंपरा केवळ शस्त्रांच्या पूजेपुरती मर्यादित नाही, तर ती थेट धर्म, न्याय आणि अधर्माच्या नाशा सोबत जोडलेली आहे. पौराणिक मान्यतेनुसार, विजयादशमीचा हा पवित्र सण, भगवान श्री रामाने लंकेचा राजा रावणाचा वध केल्याचे आणि माता दुर्गेने दृष्ट महिषासुराचा वध केल्याचे सर्वात मोठे प्रतीक मानले जाते. ज्यावेळी महिषासुराच्या दहशतीपुढे देवांची शक्तीदेखील क्षीण होऊ लागली, तेव्हा माता दुर्गेने आपली सर्व शस्त्रे उगारून त्याचा अंत केला. प्राचीन काळापासून असा विश्वास आहे की, अन्यायाचा नाश करण्यासाठी आणि स्वतःचे संरक्षण करण्यासाठी शस्त्रांचा आदर करणे आवश्यक आहे, ज्यामुळे आपण प्रत्येक परिस्थितीत विजयी होऊ शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






