
फोटो सौजन्य- pinterest
आज सोमवार, 17 नोव्हेंबरचा दिवस आज सर्व राशीच्या लोकांवर चंद्राचे राज्य राहील. आज प्रदोष व्रत देखील आहे. चंद्र कन्या राशीतून तूळ राशीमध्ये संक्रमण करत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र आणि शुक्र यांच्या युतीमुळे कलानिधि योग तयार होणार आहे. चंद्रापासून दहाव्या घरात गुरु ग्रहाचे स्थान असल्याने गजकेसरी योग तयार होईल. उत्तरा फाल्गुनी नक्षत्राच्या युतीमुळे द्विपुष्कर योग आणि प्रीती योग देखील देखील तयार होणार आहे. द्विपुष्कर योगामुळे या राशीच्या लोकांना होणार लाभ. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. रिअर आणि कामाच्या दृष्टीने आजचा दिवस खूप फायदेशीर राहील. तुमच्या मेहनतीचे कामाच्या ठिकाणी फळ मिळेल. सरकारी क्षेत्रातील कोणतेही प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते. तुम्हाला मित्र किंवा नातेवाईकांच्या मदतीनेही फायदा होऊ शकतो. व्यवसायामध्ये आर्थिक फायदा होईल. तुम्हाला सामाजिक कार्यात देखील फायदा होईल. तुम्हाला अधिकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा मिळेल.
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला वडिलांकडून पाठिंबा मिळेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी एक महत्त्वाची संधी मिळू शकते. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रांना भेटण्याची संधी देखील मिळेल. आज तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवू शकता. तुम्हाला एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी देखील मिळेल. तुम्हाला एखाद्या मित्राकडून मदत देखील मिळू शकते.
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही काही शुभ आणि धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल, तर व्यवसायात तुम्हाला आर्थिक लाभ होईल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव आणि आदर वाढेल. तुमच्या एखाद्या माजी ओळखीच्या किंवा मित्राच्या मदतीने तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो. व्यवसायाच्या उद्देशाने केलेला प्रवास यशस्वी आणि आनंददायी असेल.
धनु राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला कुठूनतरी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमच्या व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळतील. तुम्हाला अनपेक्षित स्रोताकडून पैसे मिळू शकतील. काही प्रलंबित काम पूर्ण करता येईल. एखादा मित्र किंवा शेजारी तुम्हाला एखाद्या समस्येत मदत करू शकेल. तुम्ही बँकेकडून कर्ज घेण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुमचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही तुमचे काम वेळेवर पूर्ण करू शकाल. नशिबाची तुम्हाला साथ लाभेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसायामध्ये तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. वैवाहिक जीवन चांगले राहील. कुटुंबामध्ये तुमचा प्रभाव आणि आदर वाढेल. शिक्षणाच्या क्षेत्रात असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)