फोटो सौजन्य- pinterest
चैत्र नवरात्री रविवार ३० मार्च रोजी सुरू होऊन ०७ एप्रिल रोजी समाप्त होईल. हा उत्सव नऊ दिवस आणि रात्रींचा असतो, प्रत्येक दिवस दुर्गा देवीच्या वेगळ्या रूपाला समर्पित असतो. गौरी तृतीया हे व्रत स्त्रिया सौभाग्य आणि पुत्रप्राप्तीसाठी करतात, हे शिव-पार्वतीला समर्पित आहे आणि चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला हे व्रत करतात. विवाहित स्त्रिया या दिवशी प्रातः स्नान करून उत्तम रंगीत वस्त्र (लाल साडी) परिधान करतात. नंतर शुद्ध व पवित्र अशा जागी २४ अंगूळे लांबीरुंदीची चौरस वेदी किंवा पेढी बनवतात्त. त्यावर केशर, चंदन आणि कापूर यांचे मंडळ काढून त्यावर सुवर्णाची किंवा चांदीची मूर्ती स्थापन करतात. अनेक प्रकारच्या फल पुष्प दूर्वा गंधादी साहित्याने तिचे पूजन करतात. त्याच ठिकाणी गौरी, उमा, लतिका, सुभगा, भगमालिनी, मनोन्मना, भवानी, कामदा, भोगवर्धिनी आणि अंबिका यांचे गंधपुष्यादींनी पूजन करतात. भोजन म्हणून प फक्त एकदा दुग्धपान करतात. असे केल्याने पतिपुत्रादी सौख्याची अखंड प्राप्ती होते.
तारीख: मंगळवार, १ एप्रिल
तृतीया तिथी सुरू: ३१ मार्च
तृतीया तिथी संपते १ एप्रिल रोजी सकाळी ०८:१२ वाजता तृतीया तिथी संपते.
गौरी देवी निर्दोषता, वैवाहिक आनंद, प्रजनन क्षमता आणि शक्ती यासारख्या गुणांचे प्रतिनिधित्व करते आणि गौरी तृतीया व्रताचे उद्दिष्ट आहे. देवी गौरीमध्ये भक्ती, शक्ती आणि आकर्षण हे सर्व एकत्रित आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार, देवी पार्वतीने भगवान शिवाचे प्रेम मिळविण्यासाठी कठोर तपस्या केली आणि कठोर उपवास केला. वर्षांनुवर्षे भक्ती केल्यानंतर भगवान शिव यांनी तिला पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हा त्यांचे मिलन शाश्वत प्रेम आणि वैवाहिक आनंदाचे प्रतीक बनले.
हे व्रत सौभाग्यवती स्त्रिया आणि अविवाहित मुलीही करतात, ज्यांना चांगला वर हवा असतो. या दिवशी देवी पार्वतीला सौभाग्य प्राप्त होण्याकरिता श्रृंगाराचे साहित्य अर्पण केले जाते.
या वताला सौभाग्य तृतीया असेही म्हटले जाते. या दिवशी शिव-पार्वतीची पूजा केली जाते, त्यांना फळ, फुल आणि मिठाई अर्पण केली जाते. या व्रताची कथा ऐकल्याने व्रत पूर्ण होते.
या दिवशी स्त्रिया उपवास करतात. गौरीची पूजा करताना, त्यांना सिंदूर अर्पण करतात आणि सौभाग्यवती खिया गौरीला अर्पण केलेल्या सिंदूराने आपली मांग भरतात. या व्रताच्या निमित्ताने घरामध्ये वैत्रांगण काढले जाते. चैत्रांगण म्हणजे घराच्या अंगणात काढलेले रांगोळीचे चित्र, जे चैत्र महिन्याच्या आगमनाचे प्रतीक आहे.
पती-पत्नीमधील नाते मजबूत करते. विवाहित जोडप्याला आनंद आणि समाधान देते. घरात सुसंवाद आणि समृद्धी राखण्यास मदत करते. अविवाहित महिलांना स्वीकारार्ह जीवनसाथी शोधण्यास मदत करते. मानसिक आणि आध्यात्मिक शांती आणि शक्ती वाढवते. गौरी तृतीया व्रत हे केवळ एक आध्यात्मिक विधी नाही तर ते प्रेम, भक्ती आणि स्त्री शक्तीचा उत्सवदेखील आहे. शांतीपूर्ण आणि समृद्ध जीवनासाठी देवी गौरीचे दिव्य आशीर्वाद मिळविण्यासाठी, या आशीर्वादांना पात्र होण्यासाठी भक्तांनी प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने उपवास पाळला पाहिजे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)