'या' राशीचे लोक असतात समंजस पार्टनर, बोलण्यात-व्यवसायात पटाईत, तुम्ही कोणत्या राशीचे आहात?
ज्योतिषशास्त्रानुसार एकूण बारा राशी असतात. प्रत्येक राशीचे विविध महत्त्व असते. परंतु, त्यात अशाही काही राशी असतात ज्यात माणसाचा जन्मतः स्वभाव आणि त्याच्यातील इतर गोष्टी या सुरुवातीपासून चांगल्या असतात. यातीलच एक म्हणजे मिथुन रास.
ज्या व्यक्तींच्या नावाचे पहिले अक्षर का, की, कू, घ, ड, छ, के, को, ह या अक्षरापासून सुरु होते, त्यांची रस मिथुन रास असते. मिथुन राशी ही राशीचक्रातील तिसरी रास आहे. या राशीचे स्वरुप स्त्री आणि पुरुष आलिंगनबद्ध दर्शविते. यांचा राशी स्वामी बुध ग्रह असतो. चला तर मग या राशीविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
बुध ग्रह मिथुन राशीचा स्वामी असल्यामुळे याचे परिणाम यांना जन्मापासूनच चांगले मिळत असतात. बुध ग्रहाला संवाद, बुद्धी, विवेक, गणित, तर्क आणि मित्राचे कारक मानले जाते. या राशीच्या लोकांची संवाद साधण्याची शैली फार छान असते. तसेच या राशीचे लोक जन्मतःच बुद्धिमान असतात. कोणत्याही प्रसंगातून ते अतिशय अचूकपणे स्वत:ची सुटका करू शकतात. त्यांच्या बोलण्यामुळे समोरच्या व्यक्तीवर वेगळा प्रभाव पडतो. त्यांची तार्किक क्षमता खूप चांगली असते. तसेच हे लोक व्यवसायात अतिशय हुशार असतात.
हेदेखील वाचा – मूलांक 5 असलेल्यांचा आठवडा कसा असेल ते जाणून घेऊया
मिथुन राशीचा स्वभाव दुहेरी असतो. कोणत्याही गोष्टीत ते नेहमी दोन्ही बाजूंनी विचार करतात. त्यांची विचार क्षमता फार अचूक असते. मात्र सतत विचार करण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे त्यांचा मानसिक ताण वाढतो. या स्वभावाच्या व्यक्ती नेहमी खऱ्या जोडीदाराच्या शोधात असतात. ज्यावेळी त्यांना खरा जोडीदार सापडतो. तेव्हापासून त्यांच्या आयुष्यात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात.
मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह हा नवग्रहांमध्ये युवराज मानला जातो. व्यवसाय, व्यापार आणि अभ्यासात हे लोक अतिशय हुशार व्यक्तीमत्त्वाचे असतात. मिथुन राशीला इंग्रजीत जैमिनी (Gemini) असे म्हटले जाते.
मिथुन राशीच्या लोकांसाठी हिरवा रंग फार शुभ मानला जातो. ते त्यांच्यासाठी बुधवार हा दिवस फार शुभ मानला जातो. शुभ तारीखबद्दल बोलणे केले तर त्या 5, 14 आणि 23 तारीख आहेत. तसेच मिथुन राशीसाठी शुभ रत्न आहे पन्ना. या राशींचे सिंह आणि तुळ राशीच्या लोकांसोबत चांगले जुळून येते. मेष, सिंह, तूळ, धनु, मीन आणि मिथुन राशीच्या लोकांसोबत ते वैवाहिक आणि प्रेम संबंधात अनुकूल असतात. तसेच प्रकाशन, लेखन, हॉटेल, व्यापार, सौंदर्य प्रसाधनात ते हुशार असतात. या राशीचे लोक आरोग्याच्या बाबतीत थोडे कमकुवत असते. यांना त्वचाविकार आणि पोटाचा विकार होण्याचा धोका असतो.
(टीप – ही माहिती अभ्यासानुसार देण्यात आली आहे. या लेखातील सर्व माहिती ही वाचनासाठी असून ती तंतोतंत लागू होईल असं नाही. सामान्य ज्ञानासाठी ही माहिती वाचण्यात यावी.)