फोटो सौजन्य- pinterest
रत्नशास्त्रानुसार, अशुभ दूर करण्यासाठी आणि सौभाग्य मिळविण्यासाठी नीलमणी रत्न धारण करणे फायदेशीर मानले जाते. असे मानले जाते की, हे रत्न परिधान केल्याने आनंद आणि समृद्धी वाढते. पण ते परिधान करताना काही गोष्टी लक्षात ठेवा.
रत्नशास्त्रात जीवनात सुख, शांती आणि यश मिळविण्यासाठी काही रत्ने धारण करणे खूप फायदेशीर मानले जाते. असे मानले जाते की, जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी नीलमणी रत्न परिधान केले जाऊ शकते. हे रत्न वैवाहिक जीवनातील अडचणी आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. या रत्नाला सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. दरम्यान हे रत्न परिधान केल्याने तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. हे रत्न परिधान करताना काही नियम पाळावे लागतात. नीलमी रत्न कोणी परिधान करावे, त्याचे नियम आणि फायदे जाणून घ्या.
कुंडलीत बृहस्पतिची स्थिती मजबूत करण्यासाठी नीलमणी रत्न परिधान केले जाऊ शकते. जर कुंडलीत बृहस्पति ग्रहाची स्थिती मजबूत असेल तर रत्न परिधान करण्याची गरज नाही.
सूर्यदेवाच्या कृपेने या मूलांकांच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता
असे म्हटले जाते की, जे लोक दारूचे सेवन करतात त्यांनीनीलमणी रत्न घालू नये. हे नकारात्मक परिणाम देऊ शकते.
तुम्ही मानसिकदृष्ट्या कमकुवत असाल तरीही तुम्ही हे रत्न धारण करू शकता.
वैवाहिक जीवनात अडचणी किंवा विवाह होत नसल्यास तुम्ही हे रत्न परिधान करु शकता.
Today Horoscope: प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या राशीच्या लोकांना धन योगाचा लाभ होण्याची शक्यता
कला क्षेत्राशी संबंधित लोक जसे की, कलाकार, चित्रपट निर्माते असलेले लोक हे रत्न परिधान करु शकता.
सकारात्मक परिणामांसाठी नीलमणी परिधान केले जाऊ शकते.
याला गंगाजल, कच्च्या दूधात भिजवून ठेवा आणि मंत्रांचा जप करा.
या रत्नाला सोन किंवा तांब्याच्या अंगठीत घालून परिधान करु शकता.
नीलमणी रत्न परिधान केल्याने दुर्दैव निघून जाते.
हे रत्न परिधान केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील. नात्यांमध्ये मधुरता येईल.
मान्यतेनुसार, नीलमणी रत्न परिधान केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सुख समृद्धी लाभते.
असे म्हटले जाते की, नीलमणी रत्नाच्या प्रभावामुळे मान वाढतो करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्ही हे रत्न धारण करू शकता.
( टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)