गुरू ग्रहामुळे फळफळणार या राशींचे नशीब
31 जुलै रोजी गुरू नक्षत्र बदलून रोहिणी नक्षत्राच्या चौथ्या चरणात प्रवेश करणार आहे. अनेक ज्योतिषशास्त्रांनी काही राशींसाठी हा चांगला योग असल्याचे सांगितले आहे. 19 ऑगस्टपर्यंत गुरू याच नक्षत्रामध्ये राहणार असून त्याचा 5 राशींना भरभरून लाभ होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या आहेत याबाबत आम्ही तुम्हाला या लेखात सांगत आहोत.
गुरू नक्षत्र हे अनेकांना लाभदायक असते. गुरु हा आपल्या आयुष्यात भरभराट घेऊन येतो असंही ज्योतिषशास्त्रात सांगण्यात येते. यानुसार गुरूजी सिद्धेश मणेरीकर यांनी कोणत्या राशीसाठी गुरूचे नक्षत्र बदल चांगले फळ घेऊन येणार आहे, याबाबत सांगितले आहे (फोटो सौजन्य – iStock)
मेष रास
मेष राशीला होणार गुरूचा फायदा
रोहिणी नक्षत्रात देवगुरु गुरूचा झालेला बदल हा मेष राशीच्या लोकांना चांगला लाभ देईल. या लोकांची प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतील. उत्पन्न वाढेल. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. मेष राशीला गेल्या काही महिन्यापासून आर्थिक चणचण असेल तर ती कमी होण्यास या काळात मदत मिळेल.
वृषभ रास
वृषभ राशीला फळणार असा गुरू ग्रह
गुरु सध्या वृषभ राशीत आहे. वृषभ राशीच्या लोकांना बृहस्पति ग्रहाच्या स्थितीत बदल झाल्याने मोठा फायदा होईल. धार्मिक कामासाठी प्रवासाची शक्यता आहे. घरामध्ये शुभ कार्ये होतील. काही मोठी कामे पूर्ण होतील. तुम्हाला नोकरीमध्ये बदल झाल्याचेही कळेल आणि याशिवाय पैशांचाही फायदा होईल.
कर्क रास
कर्क राशीवर होणार गुरूचा परिणाम
कर्क राशीच्या लोकांसाठीही हा काळ चांगला आहे. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात विशेष लाभ मिळेल. उत्पन्न वाढेल. नशीब चमकेल आणि तुम्हाला तुमच्या कामात सहज यश मिळेल. गेल्या काही महिन्यांपासून तंगी असेल तर पैशांचा प्रश्न मार्गी लागेल आणि गुरू बदलाचा अधिक फायदा मिळेल.
सिंह रास
सिंह राशीवर गुरू ठरेल प्रभावी
गुरू ग्रहाच्या स्थितीत बदल सिंह राशीच्या लोकांना प्रगती मिळवून. नोकरी बदलायची असेल तर वेळ चांगली आहे. कुंडलीतील ग्रह दोष दूर करण्यासाठीही हा काळ शुभ आहे. भगवान शिव तुम्हाला आशीर्वाद देतील. तसंच गुरू ग्रहाच्या बदलामुळे तुम्हाला पैशाची अडचण वा चणचण भासणार नाही.
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही