फोटो सौजन्य- pinterest
गुरुवारी वर्षातील दुसरे आणि अत्यंत पवित्र असे शक्तिशाली गुरु पुष्य योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु पुष्य नक्षत्र गुरुवारी गुरु पुष्य योग तयार होत आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. कारण तो वर्षातून फक्त दोन किंवा तीन वेळाच येतो. शास्त्रांनुसार, गुरु पुष्य योगात केलेले कार्य दीर्घकालीन आणि कायमचे शुभ फळ देते. जर तुम्हाला नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असेल, वाहन खरेदी करायचे असेल, सोने किंवा चांदी खरेदी करायची असेल, पैसे गुंतवायचे असतील आणि धार्मिक कार्य करायचे असल्यास हा योग खूप फायदेशीर मानला जातो. हा योग गुरु आणि पुष्य नक्षत्रांच्या सकारात्मक उर्जेचा संगम मानला जातो. ज्यामध्ये तुम्हाला संपत्ती, ज्ञान आणि सौभाग्य वाढते. दुसरा गुरु पुष्प योग कोणत्या राशीच्या लोकांसाठी शुभ राहणार आहे, जाणून घ्या.
18 सप्टेंबर रोजी गुरु पुष्पयोगासोबत अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. त्यामुळे या काळाचे महत्त्व आणखी वाढत आहे. गुरु पुष्य योगात सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते.
गुरु पुष्य योगात मेष राशीच्या लोकांचा हा काळ खूप शुभ राहणार आहे. सोने खरेदी करण्यासाठी हा काळ खूप फायदेशीर राहणार आहे. या काळात सोने खरेदी केल्याने आत्मविश्वास, प्रगती आणि करिअरमध्ये स्थिरता येते. तसेच या लोकांच्या आनंद आणि संपत्तीमध्ये लक्षणीय वाढ होते.
कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि तो पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे. गुरु पुष्य योगात सोने खरेदी करणे कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर मानले जाते. या काळात सोने खरेदी केल्यामुळे कुटुंबामध्ये धन आणि समृद्धी येते.
सिंह राशीच्या लोकांना गुरु पुष्प योगात सोने खरेदी करणे फायदेशीर मानले जाते. गुरु पुष्य योगात सोने खरेदी केल्याने आर्थिक प्रगती, सन्मान आणि प्रतिष्ठा आणते, असे म्हटले जाते.
तूळ राशीच्या लोकांवर शुक्र ग्रहाचे राज्य असते. गुरु पुष्य योगात सोने खरेदी करणे तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. सोने खरेदी केल्याने लक्ष्मी देवीचा आशीर्वाद, सौभाग्य आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे मिळतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)