आठवड्याचे राशीभविष्य २९ जुलै ते ४ ऑगस्ट
या आठवड्यात 31 जुलै रोजी संपत्ती, विलास आणि प्रणय देणारा शुक्राचे संक्रमण होईल. अनेक शुभ योगही तयार होतील. यामुळे 24 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान लोकांच्या करिअर आणि आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम होणार आहे. ज्योतिषी पंडित हिमांशू राय चौबे यांच्याकडून या आठवड्यातील सर्व १२ राशींचे राशीभविष्य जाणून घेऊया.
कोणत्या राशीसाठी हा आठवडा शुभदायी ठरेल आणि कोणत्या राशींना सावधगिरीने वागण्याची गरज आहे याची इत्यंभूत माहिती जाणून घ्या आणि वेळीच सावध होत त्यानुसार पावले उचला अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल (फोटो सौजन्य – iStock)
मेष साप्ताहिक राशिभविष्य
व्यवसायात तुमचे काम पारदर्शक ठेवण्याची गरज आहे. नोकरदार लोकांची बदली होऊ शकते. घराच्या नूतनीकरणाच्या कामावर पैसे खर्च होऊ शकतात. त्यामुळे पैसे वापरताना जपून आणि विचारपूर्वक वापरण्याची गरज आहे. हा आठवडा थोडा खर्चिक ठरू शकतो.
वृषभ साप्ताहिक राशिभविष्य
वृषभ राशीला फळणार असा गुरू ग्रह
करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात विस्तार होईल. गेल्या काही महिन्यांपासून तुमचे काम अडकले असेल आणि धंद्याची वा नोकरीची गाडी पुढे जात नसेल तर नक्कीच तुम्हाला या आठवड्यात यश मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन साप्ताहिक राशिभविष्य
नवीन नोकरी मिळण्याची चिन्हे आहेत. बुधाची चांगली स्थिती तुम्हाला व्यवसायात नफा मिळविण्याची संधी देईल. पैसे उधार देणे टाळा. तसंच आपला हात पैशांच्या बाबतीत आखडता घ्या अन्यथा पैशाची चणचण जाणवेल आणि आर्थिक तंगीला सामोरे जावे लागेल.
हेदेखील वाचा – मंगळाच्या संक्रमणामुळे ‘या’ राशींना प्रचंड लाभ होण्याची शक्यता
कर्क साप्ताहिक राशिभविष्य
भागीदारीतून व्यवसायात चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याशी संबंधित समस्यांवर पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. मोठा करार होऊ शकतो. संतुलन राखणारा हा आठवडा आहे. उगाच पैसे उधळू नका.
सिंह साप्ताहिक राशिभविष्य
सिंह राशीवर गुरू ठरेल प्रभावी
तुम्हाला शेअर बाजारातून पैसे मिळू शकतात. उत्पन्नासोबतच खर्चही राहील. मालमत्तेत गुंतवणूक केल्यास आर्थिक फायदा होऊ शकतो. पैसे खर्च करताना दुर्लक्ष करू नका. हात राखून खर्च करा तसंच हिशेब ठेवा.
कन्या साप्ताहिक राशिभविष्य
वडिलोपार्जित व्यवसायाव्यतिरिक्त तुम्ही इतर काही व्यवसाय सुरू करू शकता. मालमत्तेची खरेदी-विक्री करून तुम्ही पैसे कमवू शकता. ऐषआरामावर पैसा खर्च होऊ शकतो. त्यामुळे पैसे खर्च करताना थोडा विचार करा.
तूळ साप्ताहिक राशिभविष्य
धार्मिक सहलींवर पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. प्रमोशन मिळाल्यानंतर तुमचे मन प्रसन्न राहील. कायदेशीर बाबींमध्ये पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. उधार घेतलेल्या पैशांच्या व्यवहारांमुळे तुमचे नुकसान होऊ शकते.
हेदेखील वाचा – Guru Nakshatra Transit: 31 जुलैपासून 5 राशींचा वाढणार बँक बॅलन्स, पडणार पैशांचा पाऊस
वृश्चिक साप्ताहिक राशिभविष्य
कसा राहील वृश्चिक राशीसाठी आठवडा
व्यवसाय आणि नोकरी चांगली राहील. व्यवसायात मोठे आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. धोकादायक गुंतवणूक टाळा. कुटुंबातील काही शुभ कार्यात पैसा खर्च होऊ शकतो. पैसे खर्च करताना विचार करा कारण तुम्ही विचार न केल्यास खिशाला कात्री लागू शकते.
धनु साप्ताहिक राशिभविष्य
उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होतील. आरोग्यावर पैसा खर्च होऊ शकतो. तुम्हाला उधार दिलेले पैसे मिळू शकतात. तसंच तुम्हाला काही ठिकाणांहून पैसे मिळण्याचीही शक्यता आहे. तुम्ही एखाद्याला उधार दिले असतील तर नक्की आठवण करा.
मकर साप्ताहिक राशिभविष्य
कामाच्या ठिकाणी वर्चस्व वाढेल. ज्ञानाने केलेली जोखमीची गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. नोकरीत अधिकार आणि पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. हा आठवडा तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो.
कुंभ साप्ताहिक राशिभविष्य
कुंभ राशीचा आठवडा
भौतिक सुखसोयी वाढवण्यासाठी पैसा खर्च होईल. तुमची संपत्ती वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. तसंच तुमची येणी असतील तर ती पूर्ण होतील आणि या आठवड्यात व्यवस्थित पैसे जमा राहतील.
मीन साप्ताहिक राशिभविष्य
जुने कर्ज फेडल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती काहीशी कमकुवत होईल परंतु उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील. पैशाच्या गुंतवणुकीबाबत तुम्ही नवीन योजना करू शकता. नवीन व्यवसाय सुरू करू शकता.