फोटो सौजन्य- pinterest
नववर्षातील पहिला सण म्हणून मकर संक्रांत मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी केली जाते. भोगी आणि मकरसंक्रांती नंतर किंक्रांत सण साजरा केला जातो. संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणून किंक्रांतला महत्त्व आहे. या दिवसाला करिदिन म्हणून ओळखले जाते. शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानले आहे.
किंक्रांत हा विजय उत्सव आहे. पण या दिवसाला पंचागामधे अशुभ मानतात. पंचांगानुसार या पौष महिन्यात मासाचे नक्षत्र हे पुष्य आणि त्याचा स्वामी “गुरु” विरक्ती वाढवणारा असल्यामुळे या महिन्यात कोणतेही शुभकार्य केले जात नाही. साखरपुडा, लग्ने, मुंज, सुपारी अशी शुभ कार्ये करत नाहीत. तसेच गाडी, घर खरेदीही करत नाहीत. या दिवशी देवीची पूजा करून गोडधोड पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो. तिळाच्या पोळ्या करण्याची प्रथा आहे. किंक्रांत ह्या दिवशी तीळ व गूळ आपल्याला खाण्यात यावा याचे नियोजन आपले ऋषी मुनी पूर्वजांनी आपल्या शरीराची ऊर्जा वाढावी, कडाक्याच्या थंडीपासून आपलेसंरक्षण करणे ह्या हेतूनेच हे सण साजरे करण्याचे ठरवले असावे.
संकारसुर नावाचा राक्षस होता. तो गरिबांना प्रचंड प्रमाणाता त्रास देत असे. त्याचा वध करण्यासाठी देवीनो संक्रांतीचे रुप घेतले. देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकासूराचा वध केला. हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संक्रातीदेवीने किंकरासूर नावाच्या राक्षसाला देखील ठार मारले आणि त्याच्या जाचातून लोकांना मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. हिंदू पंचांगात हा दिवस करिदिन म्हणून दर्शविला जातो. या दिवशी कोणतेही शुभकार्य केले जात नाही.
वास्तू शास्त्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
किंक्रांतच्या दिवशी स्त्रिया हळदीकुंकू समारंभ साजरा करतात. या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असे सांगितले जाते, किंक्रांतला भोगीच्या दिवशी केलेली भाकरी राखून ठेवली जाते आणि ती शिळी भाकरी खाल्ली जाते, केरकचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे सांगितले जाते, तसेच दुपारी हळदीकुंकू करतात. अशा काही प्रथा किंक्रांतला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात. तसेच, यादिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याचीही प्रथा आहे. या दिवशी संक्राती देवीची पूजा करून तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. त्याचप्रमाणे कुलदैवताचे नामस्मरण केले जाते.
अंकशास्त्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
ज्योतिषशास्त्रात किंक्रांत हा दिवस अशुभ मानण्यात आला आहे. महाराष्ट्रासारख्या काही भागामध्ये या दिवशी महिला शेण सारवत नाही. या दिवशी शिळी भाकरी खाल्ली जाते. तसेच या सणाच्या दिवशी बेसनाचे धिरडे बनवण्याची परंपरादेखील आहे. किंक्रांतीला मोकळे केस सोडून काम करणे वर्ज्य मानले जाते. घरात सतत भांडण होत असतील तर या दिवशी शांत राहायला हवे. लांबचा प्रवास टाळायला हवा. या दिवशी कुलदैवतेचे स्मरण करुन देवाची करावी.