फोटो सौजन्य- istock
शरीराच्याअनेक ठिकाणी तीळ असतात. हस्तरेखाशास्त्रानुसार, शरीराच्या वेगवेगळ्या भागात तिळाचे वेगवेगळे अर्थ आहेत. काही लोकांच्या तळहातावर तीळ असतात. सामुद्रिकशास्त्रात एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर असलेल्या तिळाबद्दल तपशीलवार वर्णन दिले आहे. असे मानले जाते की, तळहातावर काही विशेष ठिकाणी तीळ असणे खूप शुभ असते. हस्तरेखाच्या मध्यभागी असलेल्या तिळाचा अर्थ आणि शुभ व अशुभ तिळाबद्दल जाणून घ्या.
तळहाताच्या मध्यभागी तीळ असणे
सामुद्रिकशास्त्रानुसार, तळहाताच्या मध्यभागी तीळ असणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की, अशा लोकांचे वैवाहिक जीवन चांगले असते. सामुद्रकशास्त्रानुसार, तळहाताच्या मध्यभागी स्थित तीळ बहुतेक वेळा सामर्थ्य आणि आत्मविश्वासाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. असे मानले जाते की, असे तीळ असलेल्या लोकांमध्ये नैसर्गिक नेतृत्व कौशल्य असते.
हेदेखील वाचा- पितृ पक्षात होणार चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण, या राशीनुसार चंद्रग्रहणाचा परिणाम
उजव्या आणि डाव्या तळहाताच्या वरच्या बाजूला तीळ असणे
हस्तरेखाशास्त्रानुसार, उजव्या तळहाताच्या वरच्या बाजूला तीळ शुभ मानला जातो. असे मानले जाते की, अशी व्यक्ती श्रीमंत असते. हस्तरेषा शास्त्रानुसार, डाव्या हाताच्या वरच्या तळहातावर तीळ असलेल्या व्यक्तीला पैसा मिळतो. पण खर्च लगेच केला जातो.
अंगठ्यावर तीळ असण्याचा अर्थ
सामुद्रिकशास्त्रानुसार, ज्या लोकांच्या अंगठ्यावर तीळ असतो तो व्यक्ती खूप मेहनती असतो. असे म्हटले जाते की, असे लोक समाजात मान सन्मान मिळवतात. असे म्हणतात की असे लोक त्यांच्या कामात परिपूर्ण असतात आणि न्यायी असतात.
हेदेखील वाचा- मूलांक 8 असणाऱ्यांचा आजचा दिवस कसा असेल ते जाणून घेऊया
मधल्या बोटावर तीळ असण्याचा अर्थ
हस्तरेखाशास्त्रानुसार, ज्या लोकांच्या मधल्या बोटांवर तीळ असते अशा लोकांचे जीवन आनंददायी असते.
करंगळीवर तीळ असण्याचा अर्थ
सामुद्रिकशास्त्रानुसार, ज्या व्यक्तीच्या करंगळीवर तीळ असतो ती व्यक्ती भाग्यशाली असते. असे म्हटले जाते की, असे लोक श्रीमंत असतात पण जीवनात त्यांना दुःखाचा सामना करावा लागतो.
चंद्रपर्वतावर तीळ असणे
करंगळीच्या खाली असणाऱ्या चंद्र पर्वताजवळ तीळ असेल तर त्या व्यक्तीच्या लग्नाला उशीर होतो किंवा त्याला प्रेमात अपयश येते.
तीळावरुन स्वभाव समजतो
उजव्या खांद्यावर तीळ असणे चिकाटीचे लक्षण मानले जाते तर डाव्या खांद्यावर तीळ असणे हे चिडचिडीचे लक्षण मानले जाते. ज्यांच्या उजव्या हातावर तीळ असतो ती व्यक्ती बुद्धिमान मानली जाते आणि डाव्या हातावर तीळ असलेली व्यक्ती भांडखोर समजली जाते. उजव्या हातावर तीळ असल्यास ती व्यक्ती मजबूत आणि मागील बाजूस तीळ असल्यास ती व्यक्ती श्रीमंत समजली जाते. डाव्या हातावर तीळ असल्यास ती व्यक्ती दिलदार समजली जाते आणि मागील बाजूस तीळ असल्यास ती व्यक्ती कंजूस समजली जाते.