laxminarayan rajyog
प्रत्येक ग्रह हा आपल्या निश्चित वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार निश्चित कालावधीत संक्रमण करतो. ऑक्टोबरमध्ये बुध आणि शुक्र ग्रह हे राशीस्थितीमधून निघून कन्या राशी मध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे कन्या राशीत लक्ष्मी नारायण योगाचा निर्माण होणार आहे. हा योग शुभ असतो. या शुभ योगामुळे अनेक राशींवर लक्ष्मीची कृपा होणार आहे. तसेच व्यापार अथवा नोकरीसाठीही हा योग्य लाभदायक ठरणार आहे. लक्ष्मी नारायण योगामुळे पदोन्नतीपासून नवीन नोकरीच्या संधी निर्माण होऊ शकतात. जाणून घ्या कोणत्या रांशीना या योगाचा होणार आहे लाभ.
मकर रास
मकर राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग अनुकूल ठरणार आहे. या योगामुळे नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकणार आहे. तसेच करिअरच्यादृष्टीने हा योग लाभदायक असणार आहे, नोकरदारवर्गाला या योगामुळे पदोन्नती आणि पगारवाढ मिळू शकते. नवीन नोकरीसाठी चांगल्या ऑफर येऊ शकतात. त्याच वेळी, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन रोजगार मिळू शकतो. व्यावसायिकांना या काळात चांगला फायदा होईल तसेच व्यवसायात विस्तार होऊ शकतो. बुधाच्या संक्रमणामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.
तूळ रास
तूळ राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी-नारायण योग अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या काळात विवाहित लोकांचे आयुष्य छान असेल. याकाळात आर्थिक स्थिती मजबूत असणार आहे. तसेच कामाच्या ठिकाणीही तुम्हाला यश मिळेल. या योगामुळे समाजात मान-प्रतिष्ठा मिळते. त्यामुळे या राशीतील लोकांचा आत्मविश्वास वाढेल, तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला मोठे यश मिळेल, पदोन्नतीही मिळू शकेल. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.
कुंभ रास
लक्ष्मी-नारायण योग हा कुंभ राशीच्या लोकांना फलदायी ठरेल. कुंभ राशीच्या लोकांची करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल, नवीन संधी मिळू शकते. नोकरदारांना पदोन्नतीसह पगारात वाढ होईल. या योगामुळे तुम्ही देश-विदेशातही प्रवास करू शकता. तसेच तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. तुमच्या कामात यश मिळेल.
या तीन राशींसाठी लक्ष्मी नारायण योग हा फलदायी ठरणार आहे.
( टीप – या लेखातील सर्व माहिती ही वाचनासाठी असून ती तंतोतंत लागू होईल असं नाही. सामान्य ज्ञानासाठी ही माहिती वाचण्यात यावी.)