मंगळागौर व्रत
हिंदू धर्मग्रंथांमध्ये श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. देवी पार्वतीला समर्पित असे हे मंगळागौरी व्रत श्रावण महिन्यातील संपूर्ण चार ते पाच मंगळवारी करण्यात येते. या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांची विधीपूर्वक पूजा केल्याने महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होते असा समज आहे.
तसेच मंगळा गौरी व्रत हे पतीचे दीर्घायुष्य आणि मुलांच्या सुखासाठी पाळले जाते. माँ दुर्गेचे आठवे रूप माँ महागौरी आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, यावेळी आजच्या मंगळवारपासून या व्रताला सुरूवात झाली आहे. मात्र या मंगळागौरीच्या व्रताच्या दिवशी महिला काय खाऊ शकतात आणि कसे असते हे व्रत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Instagram/झी मराठी)
मंगळागौरी व्रत दरम्यान काय खावे
मंगळागौरीच्या उपवासाला काय खावे
ज्योतिषशास्त्रानुसार मंगळागौरीचे व्रत करणाऱ्या महिला किंवा मुलींनी उपवासाच्या वेळी त्यांच्या खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घेतली पाहिजे. व्रताचे नियम नीट पाळले नाहीत तर शुभफळ मिळत नाही असे मानले जाते. त्याचबरोबर पुण्य फळांपासूनही व्यक्ती वंचित राहते.
महिलांनी उपवासाच्या वेळी फळांचे सेवन करावे. साबुदाण्याची खीर आणि साबुदाणा खिचडी यांचा समावेश आहारात करावा. यावेळी जेवणात मीठ न वापरण्याची विशेष काळजी घ्यावी. उपवासात दूध आणि दही यांचे सेवन करावे. सहसा फळांवर राहणे अधिक लाभदायक ठरते.
हेदेखील वाचा – श्रावणामध्ये मंगळागौरीचे व्रत का ठेवले जाते? जाणून घ्या महत्त्व
मंगळागौर व्रत का करतात?
श्रावण मंगळवारी मंगळागौरी व्रत केल्याने माणसाला इच्छित जीवनसाथी मिळतो, अशी धार्मिक धारणा आहे. एवढेच नाही तर या व्रताच्या पुण्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो. तसेच महिलांना संततीचा आनंद मिळतो आणि पती व मुलांना दीर्घायुष्य मिळते असे यातील कथेचे सार आहे.
हेदेखील वाचा – श्रावणातील पहिली मंगळागौर कधी केली जाणार आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, स्तोत्र
कसे करावे मंगळागौर व्रत