फोटो सौजन्य- pinterest
हस्तरेषाशास्त्रानुसार, तळहातावरील रेषाच नाही तर बोटांमधील अंतर देखील आपल्या स्वभावाबद्दल आणि जीवनाबद्दल अनेक रहस्ये उलगडते. तुमच्या बोटांमधील अंतर तुमच्या विचारसरणी, व्यक्तिमत्त्व आणि तुमचे भविष्य देखील प्रकट करू शकते. बोटांमधील असलेल्या अंतराचे महत्त्व जाणून घ्या
जर तुमच्या तर्जनी आणि मधल्या बोटात थोडेसे अंतर असेल तर तुम्ही मोकळ्या मनाचे आणि ध्येय साध्य करण्यासाठी दृढनिश्चयी आहात. असे मानले जाते. त्यासोबतच अशा लोकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोनाने नवीन कल्पना स्वीकारतात. या लोकांना योजना बनवायला आवडतात. असे लोक स्वतंत्र विचार करणारे असतात.
ज्यावेळी प्रत्येक बोटामध्ये अंतर असते असे लोक आनंदी, आरामशीर आणि सामाजिक व्यक्ती असल्याचे मानले जाते. तुम्ही इतरांच्या भावना समजून घेता आणि आयुष्यात आशावादी असण्याची प्रवृत्ती बाळगता.
जर मधल्या आणि अनामिका बोटांमध्ये खूप अंतर असल्यास निष्काळजीपणा आणि स्वार्थी स्वभाव असल्याचे मानले जाते. असे लोक स्वतःच्या गरजांना प्राधान्य देतात, ज्यामुळे नातेसंबंधांमध्ये अंतर निर्माण होऊ शकते. असे लोक स्वतःसाठी एक ठाम भूमिका घेतात, जी कधीकधी असामान्य वाटू शकते, परंतु ते स्वभावाने बंडखोर असतात आणि ट्रेंडचे अनुसरण करत नाहीत.
जर अनामिका आणि करंगळीमध्ये अंतर असेल तर ती व्यक्ती तापट स्वभावाची असते, परंतु ती आपल्या कुटुंबाशी समर्पित आणि निष्ठावान असते. ते बोलत असताना नेहमीच त्यांचा उद्देश ओळखतात आणि त्यांचे विचार व्यक्त करण्यास अजिबात संकोच करत नाहीत. अशा लोकांना त्यांच्या तरुणपणी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
जर तुमची बोटे एकमेंकाच्या जवळ असल्यास तुम्ही गंभीर, लक्ष केंद्रित आणि जबाबदार आहात. दरम्यान हे कधीकधी कडकपणा आणि हट्टीपणामध्ये रूपांतरित होऊ शकते. असे लोक खूप भाग्यवान असतात. अशा बोटांचे लोक त्यांच्या आयुष्यात अनेक सुखसोयींचा आनंद घेतात. शिवाय, त्यांना धन आणि धान्याची कमतरता नाही.
तुमच्या बोटांची लांबी आणि जाडी देखील तुमचे व्यक्तिमत्व प्रतिबिंबित करते. लांब, बारीक बोटे असलेले लोक सर्जनशील असतात, तर जाड बोटे असलेले लोक अधिक व्यावहारिक आणि मेहनती असतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)