शुक्राचा प्रभाव असलेल्या 'या' दोन राशींच्या प्रेमात लोक वेडे होतात
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचा ग्रह स्वामी असतो. त्यानुसार त्या ग्रहाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव हा त्या राशीस्वामीनुसार ठरत जातो.असं म्हटलं जातं की, तुम्ही ज्यावेळी जन्माला येता त्यावेळी चंद्र ज्या राशीत असतो ती रास तुमची जन्मरास असते. हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राला मोठं महत्त्व आहे. या राशीनुसार प्रत्येकाचे स्वभाव, विचारसरणी आणि आवडी राशीस्वामीशी साधरण मिळत्या जुळत्या असतात. त्यावरुन एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज लावला येतो. ज्योतिषशास्त्रानुसार अशा काही राशी आहेत ज्यांना प्रेमाची आणि कलेची रास म्हणून ओळखलं जातं,कोणत्या आहेत या राशी जाणून घेऊयात..
प्रत्येक राशीचा कोणता ना कोणचा ग्रह हा राशी स्वामी आहे. या प्रत्येक राशीस्वामीचा स्वत:चं असं एक वैशिष्ट्य आहे. त्यातील एक ग्रह म्हणजे शुक्र. शुक्र हा कलेचा आणि प्रेमाचा अविष्कार असल्याचं म्हटलं जातं. वृषभ आणि तुळ या राशींचा राशीस्वामी शुक्र आहे. त्यामुळे कलारसिक आणि प्रेमळ व्यक्तीमत्त्व यासाठी तुळ आणि वृषभेच्या व्यक्तींकडे अनेकजण आकर्षित होतात. त्यामुळे या दोन्ही राशींच्या व्यक्ती समाजात लोकप्रिय असतात.
शुक्राचा प्रभाव या राशीवर दिसून येतो. ही मंडळी दिसायला आकर्षक असतात. मोहक व्यक्तीमत्त्व आणि उत्तम संवाद कौशल्य यांच्याकडे असते. या व्यक्तींची राहणीमान इतरांना मोहून टाकते. त्यामुळे बऱ्याचदा ऑफिसमध्ये देखील यांच्या कामाची आणि व्यक्तीमत्त्वाची छाप इतरांवर पडते. ही मंडळी आयुष्यात प्रेमाला खूप महत्त्व देताता. यांना महागड्या वस्तू वापरणं, शॉपिंग करणं याची आवड असते. त्याचबरोबर हे कलारसिक देखील असातात. ही मंडळी अभिनयक्षेत्रात चांगलं नाव कमवतात. वृषभ राशीची मंडळी स्वत:च्या हिंमतीवर आयुष्य जगण्याला प्राधान्य देतात. कठीण परिस्थितीतही या व्यक्ती आपल्याला हवं ते साध्य करण्यासाठी पुरेपुर मेहनत घेतात. मात्र यांना रागही तितकाच जास्त येतो. या माणसांना रागावर नियंत्रण मिळवलं पाहिजे असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं.
वृषभ राशीप्रामाणे तुळ रास देखील शुक्राच्या अधिपत्याखाली येते. वृषभेप्रमाणे शुक्राचा प्रभाव तुळेवर देखील असला तरी तुळेतली माणसं कलासक्त आयुष्य जगतात. सावळ्या वर्णाची ही मंडळी सडपातळ आणि मध्यम उंचीची असतात. तुळेतला शुक्र हा कला आणि विज्ञानाचा कारक आहे. ही माणसांची देवावर श्रद्धा असली तरी कर्मकांडांवर यांचा विश्वास नसतो. विज्ञानाच्या आधारावर हे देव मानतात. ही मंडळी शांत आणि संयमी स्वभावाची असतात. समोरच्याचं म्हणणं ऐकून घेणं यांना आणि त्यावर योग्य तो तोडगा काढणं यांना चांगलं जमतं. म्हणूनच ही माणसं राजकरणात आणि सामाजिक कार्यात देखील लोकप्रिय असतात. तुळ राशीची माणसं प्रेम आणि करियर यात संतुलन राखणारी असतात. तुळ राशीचं चिन्ह तराजू आहे. या तराजूप्रमाणेच ही मंडळी कठीण परिस्थितीतही स्वत:ला बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न करतात. शांत आणि संयमी असल्याने ही माणसं दिसायला मोहक असतात.
या मंडळींना संगीत, चित्रकला, गायन. वादन, लेखन यात जास्त रस असतो. या शिवाय ही मंंडळी परफ्युमचे चांगले व्यापारी म्हणूनही उत्तम करियर करतात. ही माणसं मित्र मंडळींमध्ये अत्यंत लाडकी असतात. मात्र बऱ्याचदा तुळ राशीची मंडळी आपल्याचं माणसांकडून जास्त दुखावले जातात. ही माणसं संवेदवशील असतात. तुळ राशीला मुत्राशयासंबंधित आणि महिलांना गर्भाशयाचे आजार होण्याची शक्याता असते. ज्योतिष शास्त्रानुसार तुळ आणि वृषभ या दोन्ही राशींच्या व्यक्तीमत्वावर शुक्राचा प्रभाव जास्त असतो. त्यामुळे यांच्या प्रेमात लोक वेडे होतात.