
फोटो सौजन्य- pinterest
2025 च्या शेवटच्या महिन्याच्या सुरुवातीला राहू हा छाया ग्रह संक्रमण करणार आहे. 2 डिसेंबर रोजी तो शताभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. राहू 2 ऑगस्टपर्यंत याच नक्षत्रात राहणार आहे. योगायोगाने, शतभिषा नक्षत्राचा स्वामी ग्रह राहू स्वतः आहे. म्हणूनच, राहूचा स्वतःच्या घरात प्रवेश हा एक दुर्मिळ योगायोग आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यावेळी एखादा ग्रह स्वतःच्या राशीमध्ये किंवा नक्षत्रामध्ये येतो त्यावेळी त्याचा प्रभाव सामान्य राहतो. म्हणूनच राहूचे नक्षत्र काही राशींना फायदेशीर ठरणारे राहील. कारण राहू भौतिक इच्छा, कीर्ती आणि आर्थिक लाभाचा कारक आहे. या राशीच्या लोकांना क्षेत्रात चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. राहू संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांचा राहूचा नक्षत्र बदल शुभ असणार आहे. तुमच्या व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. या काळात मेष राशीच्या लोकांमधील आत्मविश्वास वाढेल आणि ते अनेक कामे पूर्ण करतील. तुम्ही खूप मेहनत घेतल्यास तुमचे ध्येय सहज साध्य कराल. भविष्यासाठी योजना आखण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. या काळात नोकरीच्या नवीन संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी लोक तुमच्या व्यक्तिमत्त्वाने आणि कल्पनांनी प्रभावित होतील.
वृषभ राशीच्या लोकांसाठी राहूचे संक्रमण खूप फायदेशीर राहणार आहे. तुम्हाला कामासाठी परदेशात जावे लागू शकते. नवीन लोकांना भेटण्याची सुवर्णसंधी मिळू शकते. वृषभ राशीच्या लोकांना या काळात व्यवसायात भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमची व्यवसायामध्ये प्रगती होईल. तुम्हाला लग्नाचे चांगले प्रस्ताव मिळू शकतात. तुम्ही केलेले प्रयत्न पूर्णपणे यशस्वी होतील, ज्यामुळे जीवनात समृद्धी आणि आनंद येईल.
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहणार आहे. या काळात लग्न होण्याची शक्यता आहे. तुमच्या आयुष्यात कोणीतरी खास व्यक्ती येऊ शकते. सर्जनशील किंवा इतर नाविन्यपूर्ण कामांमध्ये सहभागी असलेल्यांना या काळात फायदा होईल.
नातेसंबंधांमध्ये प्रेम बहरेल. तुमच्या कारकिर्दीतील अडथळे दूर होऊ शकतात. कुटुंबासह तुम्ही धार्मिक स्थळी जाऊ शकता. देशात आणि परदेशातही आदर मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे मन आनंदी राहू शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: राहू हा छायाग्रह मानला जातो. त्याचे संक्रमण म्हणजे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश.
Ans: या संक्रमणाचा मेष, वृषभ आणि कुंभ राशीच्या लोकांना फायदा होईल.
Ans: राहूचे नक्षत्र संक्रमण 2 डिसेंबर रोजी होणार होणार आहे