Rahu Ketu Nakshatra Parivartan 2026: ज्योतिषशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की, एका ठराविक वेळेनंतर ग्रह त्यांची चाल बदलतात. याचआधारे एप्रिलमध्ये राहू केतूचं परिवर्तन होणार आहे. त्यामुळे याचा जास्त फायदा हा चार राशींना होणार आहे.
राहू केतू यांना कलियुगातला राजा असं म्हटलं जातं. खरंतर हे छाया ग्रह आहेत असं ज्योतिषशास्त्र सांगतं. हे दोन्ही ग्रह कायम उलट्याच दिशेने गोचर करतात. त्यामुळे पत्रिकेत राहू केतूची दृष्टी म्हटल्यावर अनेकांना भिती वाटते. पण आता याच राहू केतूची कृपादृष्टी चार राशींवर होणार आहे. यंदाचा या दोन्ही ग्रहांचा दुर्मिळ संयोग नुकसान नाही तर फाय़दा करुन देणार आहेत. कोणत्या आहेत त्या राशी चला तर मग जाणून घेऊयात.
मेष (Arise)
एप्रिल मध्यानंतरचा काळ हा मेषराशीसाठी सोन्याते दिवस आणणार आहे. राहूच्या नक्षत्र परिवर्तनामुळे तुमची तुमच्या अपेक्षेपेक्षाही जास्त मची आर्थिक बाजू मजबूत होईल. गुतंवणूकदारांना याचा मोठा फायदा देखील होणार आहे. शेअरबाजारात किंवा कोणत्याही मालमत्तेत आधी गुंतवणूक केली असेल तर आता तेजीने याचा परतावा मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक होईल. तुमच्या करियरमध्ये चांगला बदल तुम्हाला राहू केतूच्या कृपादृष्टीने होईल.
मिथुन (Gemini)
केतूच्या नक्षत्रातील बदलामुळे मिथुन राशीच्या मंडळीचं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. खूप काळापासून तुमच्या कोर्ट केस सुरु असतील तर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला चांगले बदल दिसून येतील. कोर्टाचा निकाल तुमच्याबाजूने लागण्याची शक्यता आहे. व्यापार वर्गाला याचा नफा होऊ शकतो. राहू केतूचं परिवर्तन तुम्हाला नोकरी व्यवसायात चांगले बदल घडवून आणतील.
तूळ: (Libra)
गेले कित्येक महिने तुळ राशीच्या पाचव्या भावात राहू आहे. हा राहू पाचव्या भावात ऑक्टोबरपर्य़ंत असणार आहे. या पाचव्या भावातील राहूमुळे तुमच्याबद्दल समोरच्या वक्तीच्या मनात अनेक गैरसमज निर्माण झाले होते. नातं तुटण्याच्या मार्गावर होतं. मात्र आता राहू-केतूच्या कृपादृष्टीने तुळेच्या मंडळींना नातेसंबंधात चांगले बदल दिसून येतील. . जीवनसाथीसोबतचे वाद संपतील आणि नात्याची चांगली सुरुवात होईल. कुटुंबासह चांगला वेळ घालवण्याच्या अनेक संधी मिळतील. मानसिक शांतता लाभेल.
धनु (Sagittarius)
धनु राशीसाठी राहूचा प्रभाव खूप चांगला राहणार आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्य़ा विद्यार्थांना एप्रिलचा मधला काळ सकारात्मक असणार आहे. व्यावसायिक शिक्षण किंवा नोकरीसाठी परदेशात जाण्याचे स्वप्न पाहत होते, त्यांना ६ एप्रिलनंतर एक मोठी आनंदाची बातमी मिळेल. या काळात तुमचं सामाजिक महत्त्व वाढेल. राजकारण किंवा समाजकार्यात गुंतलेल्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला आहे, तुमची प्रतिष्ठा आणि लोकप्रियता प्रचंड वाढेल.






