
'या' राशीेंवर होणार आहे शनिदेवाची कृपा (फोटो सौजन्य - Pinterest/iStock)
सध्या शनि मीन राशीत आहे. शनि सर्वात मंद गतीने फिरतो. एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होण्यासाठी अडीच वर्षे लागतात. २०२६ या नव्या वर्षामध्ये शनि धन राजयोगाची स्थापना करेल. यामुळे अनेक राशींना सौभाग्य आणि आर्थिक लाभ होईल. २०२६ मध्ये शनि त्याच्या उदीयमान अवस्थेत हा राजयोग करेल, ज्यामुळे अनेक राशींना फायदा होईल. ज्योतिषाचार्य आनंद पाठक यांनी याबाबत अधिक माहिती सविस्तरपणे दिली आहे, आपण याबद्दल जाणून घेऊया
Swapna Shastra: तुम्हालाही स्वप्नात सतत मृतात्मे दिसतात? ५ संकेतांवरून ओळखल्यास, उघडतील नशिबाची दारं
तूळ राशीला होणार फायदा
तूळ राशीच्या लोकांसाठी धन राज योगाची निर्मिती अत्यंत शुभ राहील. याचा तुम्हाला फायदा होईल. आत्मविश्वास वाढेल आणि न्यायालयीन प्रकरणांचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. वैवाहिक जीवन गोड असेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला असेल. तुम्हाला पदोन्नती किंवा पगारवाढीचा आनंद अनुभवता येईल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंद येईल.
कर्क राशीच्या व्यक्तींना सकारात्मक राहील नवे वर्ष
कर्क राशीच्या लोकांना शनि धन राजयोगामुळे फायदा होणार आहे. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक राहील. बऱ्याच चांगल्या गोष्टी तुमच्याबरोबर घडतील आणि तुम्हाला नशीब आणि मानसिक शांती मिळेल. तुमचा त्रास कमी होईल आणि तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. करिअरमध्ये प्रगतीमुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि हे वर्ष तुम्हाला सुखसमाधानाचे जाईल
मकर राशीसाठी उत्तम ठरेल वर्ष
मकर राशीच्या लोकांसाठी धन राजयोग अत्यंत शुभ राहील. मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची कोणतीही इच्छा पूर्ण होईल. तुमच्या सर्व योजना यशस्वी होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील आणि या वर्षात तुमची शनिच्या या धन राजयोगामुळे उन्नती होईल. रखडलेली अनेक कामं मार्गी लागण्यासही हा काळ उत्तम आहे.
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra.com या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.