फोटो सौजन्य- pinterest
पितृपक्षाच्या समाप्तीनंतरन नवरात्रीची सुरुवात होत आहे. यंदा सोमवार, 22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होत आहे. असे मानले जाते की, जर या नऊ दिवसांमध्ये खऱ्या मनाने देवीची पूजा केल्यास सर्व वाईट गोष्टी दूर होतात. अशा वेळी देवीला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे विधी करुन देवीची पूजा केली जाते. यामध्ये वास्तु उपायांचा समावेश आहे.
वास्तुशास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या घरात वास्तुदोष असल्यास त्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात आणि गोष्टीही बिघडू शकतात. अशा वेळी, नवरात्रीत देवीची कृपा तुमच्यावर राहण्यासाठी तुम्ही हे उपाय करू शकता. नवरात्रीमध्ये वास्तूचे कोणत्या नियमांचे पालन करावे, जाणून घ्या
वास्तुनुसार, घराच्या मुख्य दरवाजाची रचना, आकार आणि दिशा त्या घरात राहणाऱ्या लोकांच्या प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते, कारण आपल्या घरात इथून ऊर्जा प्रवेश करते. अशा वेळी घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असल्यास ती सर्वांसाठी खूप फायदेशीर ठरते. म्हणून काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
मुख्य दरवाजाजवळ नेहमी स्वच्छ ठेवावा.
मुख्य दरवाजाजवळ कचऱ्याचे डबे किंवा झाडू ठेवू नये.
तुमचा मुख्य दरवाजा आवाज न करता सहज उघडेल आणि बंद होईल याची विशेष काळजी घ्यावी.
वास्तुशास्त्रानुसार घटस्थापनेसाठी ईशान्य दिशा सर्वात शुभ मानली जाते. तसेच, देवीची मूर्ती किंवा फोटो ईशान्य दिशेला ठेवा जेणेकरून मूर्ती पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून राहील.
देवीची पूजा करण्यासाठी ईशान्य दिशेला तोंड असणे सर्वांत शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार ही दिशा सर्वात पवित्र, शुभ आणि सकारात्मक मानली जाते. या दिशेला पूजा केल्याने तुम्हाला पूजेचे पूर्ण पुण्य मिळते असे म्हटले जाते. जर काही कारणास्तव तुमच्या घरामध्ये ईशान्य कोपरा नसेल तर तुम्ही उत्तर किंवा पूर्व दिशेला देखील पूजा करु शकता.
नवरात्रीमध्ये जर तुम्ही शाश्वत ज्योत ठेवत असल्यास त्या ज्योतचे तोंड नेहमी आग्नेय दिशेला असावे. वास्तुनुसार, शाश्वत ज्योत प्रज्वलित करण्यासाठी ही योग्य दिशा आहे.
वास्तुनुसार, नवरात्रीत गरीब आणि गरजूंना काळे तीळ, उडीद डाळ आणि अन्न दान केल्याने शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)