फोटो सौजन्य- istock
1953 मध्ये शेवटच्या वेळी श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारी झाली होती. तब्बल 71 वर्षांनंतर यंदा हा योग पुन्हा आला आहे. यंदा उद्या म्हणजेच 5 ऑगस्ट सोमवारपासून श्रावण सुरु होत आहे अन् सोमवारीच त्याची समाप्ती होणार आहे.
हेदेखील वाचा- सिद्धनाथ मंदिर कुठे आहे? जाणून घ्या इतिहास
हिंदू धर्मात श्रावण महिना हा सर्वांत महत्त्वाचा महिना मानला जातो. त्यामुळे अनेक जण श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. भगवान शंकराला श्रावण महिना फार प्रिय आहे. त्यामुळेच या महिन्याचे महत्त्व अधिक आहे. हा महिना भगवान शंकराला समर्पित असल्यामुळे अनेकजण यादरम्यान व्रत वैकल्ये, उफवास करतात. यंदाच्या श्रावण महिन्यात एक शुभ संयोग जुळून आल्यामुळे हा श्रावण महिना विशेष मानला जातो. महादेवाची पूजा करण्याची पूजाविधी, मुहूर्त जाणून घ्या.
हेदेखील वाचा- बाथरुममुळे तुम्हालाही अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय का? जाणून घ्या वास्तू दोष
श्रावणमासात महादेवांची पूजा कशी करतात
या काळात सोमवारी आंघोळ वगैरे झाल्यावर स्वच्छ कपडे घालावेत. पूजा गृहात किंवा शिवमंदिरात जाऊन सर्व प्रथम भगवान शंकराला पाण्याने अभिषेक करावा. त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्रासह सर्व पूजेचे साहित्य एकत्र करुन ते अर्पण करावे. नंतर अगरबत्ती आणि कापूर लावून आरती करावी. शांत मनाने हात जोडून शिव मंत्राचा जप करा. पूजेनंतर दिवसभर उपवास करून फराळ करा.
पहिला श्रावणी सोमवार शुभ मुहूर्त
अमृत मुहूर्त सकाळी 5 वाजून 37 मिनिटांपासून ते सकाळी 7 वाजून 20 मिनिटांपर्यंत
शुभ मुहूर्त सकाळी 9 वाजून 2 मिनिटांपासून ते सकाळी 10 वाजून 45 मिनिटांपर्यंत
सायंकाळी पूजेचा मुहूर्त 5 वाजून 35 मिनिटांपासून ते रात्री 8 वाजून 35 मिनिटांपर्यंत
71 वर्षांनी आला योग
श्रावणाची सुरुवात सोमवारपासून होणे हे शुभ मानले जाते. कारण, भगवान शंकराचा वार सोमवार आहे. तसेच श्रावण समाप्तीही सोमवारीच होणार आहे. त्याचबरोबर यंदाच्या श्रावणात पाच सोमवार आले आहेत. ५ सोमवारांचा योगायोग बऱ्याच वर्षांनी जुळून आला आहे. त्यामुळे हेदेखील एक वैशिष्टय मानले जात आहे.
पूजेदरम्यान या शिव मंत्रांचा जप करा
ॐ नमः शिवाय ॥
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
ॐ नमो भगवते रूद्राय।
ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि। तन्नो रुद्रः प्रचोदयात् ॥