फोटो सौजन्य- pinterest
सप्टेंबर महिन्यामध्ये आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तेराव्या दिवशी म्हणजे त्रयोदशीच्या दिवशी हे व्रत पाळले जाते. यावेळी या योगाच्या वेळी सिद्ध योग तयार होईल आणि रात्री भद्रा ग्रह लागणार आहे. शुक्र प्रदोष व्रतामध्ये पूजा करण्याचा कालावधी 2 तासांचा मिळणार आहे. या काळात पूजा केल्याने व्यक्तीला जीवनात आनंद, समृद्धी आणि संपत्ती मिळते, असे म्हटले जाते. शुक्र प्रदोष व्रत कधी आहे आणि पूजा करण्यासाठी मुहूर्त काय आहे, जाणून घ्या
पंचांगानुसार, आश्विन शुक्ल त्रयोदशी तिथीची सुरुवात गुरुवार, 18 सप्टेंबर रोजी रात्री 11.24 वाजल्यापासून होत आहे. या तिथीची समाप्ती 19 सप्टेंबर रोजी रात्री 11.36 वाजता होणार आहे. उद्यतिथीनुसार ही यावेळी 19 सप्टेंबर रोजी शुक्र प्रदोष व्रत पाळले जाणार आहे.
शुक्र प्रदोष व्रताच्या दिवशी सिद्ध योग आणि साधी योग तयार होत आहेत. शुक्र प्रदोष व्रताच्या दिवशी पहाटेपासून रात्री 8.41 पर्यंत सिद्ध योग राहील. त्यानंतर साधी योग तयार होईल. या दिवशी आश्लेषा नक्षत्र पहाटेपासून सकाळी 7.5 वाजेपर्यंत प्रभावी असते त्यानंतर माघ नक्षत्र येते. याच दिवशी मासिक शिवरात्रीचे व्रत देखील पाळले जाणार आहे.
शुक्र प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाची पूजा करण्यासाठी 2 तास 21 मिनिटांचा कालावधी मिळणार आहे. शुक्र प्रदोषाच्या दिवशी महादेवाची संध्याकाळी पूजा करण्यासाठी संध्याकाळी 6.21 ते 8.43 पर्यंत मुहूर्त आहे. या काळात महादेवांची पूजा केली जाते. प्रदोषाच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त पहाटे 4.34 ते 5.21 पर्यंत असेल. तर अभिजित मुहूर्त सकाळी 11.50 ते दुपारी 12.39 पर्यंत असेल.
प्रदोष व्रताच्या दिवशी भद्राची सुरुवात रात्री 11.36 वाजता होणार आहे. तर 20 सप्टेंबर रोजी सकाळी 6.8 वाजता भद्रा संपेल. या काळात भद्रा पृथ्वीवर असेल त्या काळात कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे.
प्रदोष व्रताच्या वेळी राहूकाळ सकाळी 10.43 ते दुपारी 12.15 पर्यंत राहील. असे म्हटले जाते की, या काळात पूजा केल्याने कालसर्प दोषापासून सुटका होण्यासाठी आपण काही उपाय करु शकतो.
मान्यतेनुसार, प्रदोष व्रत सर्व वाईट प्रकारच्या गोष्टी दूर करते. या काळात महादेवांची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःख कमी होते. महादेवाच्या आशीर्वादाने व्यक्तीला आरोग्य, संपत्ती, आनंद आणि समृद्धी प्राप्त होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)