Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चंपा षष्ठीपासून या राशींना वैधृती योगामुळे होईल धनवृष्टी

चंपा षष्ठीचे व्रत शनिवार 7 डिसेंबर रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी तयार झालेल्या शतभिषा नक्षत्र आणि वैधृती योगाच्या शुभ संयोगामुळे 3 राशीच्या लोकांचे नशीब उजळणार आहे. जाणून घेऊया या राशींबद्दल.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 07, 2024 | 09:48 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Close
Follow Us:

सनातन धर्मात उपवास आणि सणांना विशेष महत्त्व आहे. म्हणूनच वर्षभर काही ना काही व्रत किंवा सण येतच असतात. चंपा षष्ठी व्रत हेदेखील त्यापैकीच एक. होय, मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला चंपा षष्ठी साजरी केली जाते. उदयतिथीनुसार यावेळी चंपा षष्ठीचे व्रत शनिवार 7 डिसेंबर रोजी होत आहे. हा दिवस भगवान शंकराचा अवतार खंडोबाला समर्पित आहे. असे मानले जाते की, चंपा षष्ठी व्रत पाळणाऱ्या व्यक्तींची भूतकाळातील पापे धुऊन जातात आणि त्यांचे भविष्य सुखी होते.

ज्योतिषाच्या मते, शतभिषा नक्षत्रात वैधृति योग जुळून आल्यावर चंपा षष्ठी साजरी केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार असा शुभ संयोग 7 डिसेंबर रोजी होत आहे. हा योग अतिशय शुभ मानला जातो, जो एखाद्या विशेष योगाप्रमाणे काम करतो ज्यामुळे धन आणि भाग्य मिळते. हे नक्षत्र आणि योग 3 राशीच्या लोकांसाठी भाग्यवान सिद्ध होऊ शकतात. जाणून घ्या कोणत्या त्या 3 भाग्यशाली राशी आहेत?

चंपा षष्ठी शुभ मुहूर्त

चंपा षष्ठीची सुरुवात शुक्रवार 6 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजून 7 मिनिटांनी आणि त्याची समाप्ती रविवार 8 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजून 5 मिनिटांनी होईल.

अंकशास्त्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

वृषभ

चंपा षष्ठीला शतभिषा नक्षत्र आणि वैधृती योग तयार होणे हे वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ संकेत आहेत. या लोकांना आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळतील. नवीन योजनांमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. व्यवसाय वाढेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे. एकत्र काम करणाऱ्या मित्र आणि सहकाऱ्यांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल. व्यावसायिकांसाठी हा काळ अतिशय शुभ आहे. नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होतील.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी, शतभिषा नक्षत्रासह वैधृती योगाचा शुभ संयोग आर्थिक दृष्टीकोनातून चांगला राहील. एकीकडे तुमचे उत्पन्न वाढेल, पण तुमचे खर्च नियंत्रणात राहतील. नोकरदार लोकांमध्ये अधिकार आणि जबाबदारी वाढेल. याचा आर्थिक फायदाही होईल. सहकाऱ्याच्या मदतीने उत्पन्नाचे नवे स्त्रोत विकसित होऊ शकतात. व्यावसायिकांसाठी हा काळ खूप फायदेशीर असेल. नवीन व्यावसायिक सौदे होतील आणि व्यवसायाचा विस्तार होईल.

राशिभविष्य संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

धनु रास

शतभिषा नक्षत्राशी वैधृती योगाच्या शुभ संयोगाचा सकारात्मक प्रभाव यावेळी धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. हा आर्थिक फायदा शेअर बाजारातील परतावा किंवा कोणत्याही लॉटरीतून होऊ शकतो. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल. कामात यश मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. व्यवसायातही फायद्याचे नवीन मार्ग खुले होतील. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तब्येत सुधारेल.

 (टीप – ही माहिती अभ्यासानुसार देण्यात आली आहे. या लेखातील सर्व माहिती ही वाचनासाठी असून ती तंतोतंत लागू होईल असं नाही. सामान्य ज्ञानासाठी ही माहिती वाचण्यात यावी.)

Web Title: Spirituality champa shashti validity yoga dhanvrishti zodiac signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2024 | 09:18 AM

Topics:  

  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Astrology : घराच्या बाल्कनीत किंवा छतावर कबुतरांनी अंडी घालणं शुभ की अशुभ? वास्तुशास्त्र काय सांगतं? वाचा सविस्तर
1

Astrology : घराच्या बाल्कनीत किंवा छतावर कबुतरांनी अंडी घालणं शुभ की अशुभ? वास्तुशास्त्र काय सांगतं? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.