फोटो सौजन्य- फेसबुक
श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा महिना असून भगवान शिवाला समर्पित आहे. या महिन्यात महादेवाच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवशी विविध सण आणि व्रत-वैकल्ये केले जातात. श्रावण महिना सुरु होताच देवघराजवळ जिवतीचा फोटो किंवा कागद चिकटविला जातो. श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे. श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जिवतीचे व्रत म्हणजे पूजा केली जाते. आईने मुलांसाठी करावयाचे हे व्रत असल्याचे सांगितले जाते. श्रावणातील दुसऱ्या शुक्रवारी जिवतीची पूजा कशी करावी? ते जाणून घेऊया.
जिवतीची पूजा
श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते. जिवतीची पूजा मुलांच्या रक्षणार्थ केली जाते. जिवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. जिवतीची पूजा करताना जरे जीवन्तिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते हा मंत्र म्हटला जातो. जिवतीच्या पूजेसाठी दुर्वा, फुले, आघाड्याची पाने, धूप, दीप, नैवेद्य इत्यादी अर्पण करावे. जिवतीची पूजा झाल्यावर लहान मुलांना पाठावर बसून त्यांचे औक्षण करावे. जिवतीच्या पूजेमुळे घरात आरोग्य, धन, सुख लाभते असे म्हटले जाते.
हेदेखील वाचा- पुत्रदा एकादशीचे व्रत का केले जाते? जाणून घ्या पूजा पारणाची वेळ, कथा
जिवती पूजेचे महत्त्व
श्रावण महिना सुरु झाला की, घरातील देवघराजवळ जिवतीचा कागद लावला जातो याची पूजा श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी केली जाते. जिवतीची पूजा करताना जरे जीवन्तिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते हा मंत्र म्हटला जातो. श्रावणात येणाऱ्या शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते. ही पूजा मुलांच्या संरक्षणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी आई करते.
हेदेखील वाचा- मूलांक 8 असलेल्यांचा आजचा दिवस कसा असेल ते जाणून घेऊया
जिवतीची कथा
जिवती ही बालकांची रक्षण करणारी देवी आहे, असे पुराणात म्हटले आहे. पौराणिक कथेनुसार, मूळची राक्षसीण असणारी जरा मगध देशात राहत होती. त्यावेळी मगधच्या राजाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असणारा पुत्ररत्न प्राप्त झाला. यामुळे तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले. वेळी जरा राक्षसीणीने बाळाचे दोन वेगवेगळे भाग एकत्र करुन त्याला पुन्हा जीवदान दिले. म्हणून ते बाळ जरासंध या नावाने ओळखले जाऊ लागले. यामुळे मगध राज्यात जरा राक्षसीणीचा महोत्सव केला गेला. लोक तिला मुलांची आई समजू लागले. घरोघरी तिची पूजा केली जाऊ लागली, असे पुराणात म्हटले आहे.
जिवतीची आरती
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।
श्रावण येतांचि आणूं प्रतिमा । गृहांत स्थापूनि करू पूजना ।
आघाडा दुर्वा माळा वाहूंया । अक्षता घेऊन कहाणी सांगू या ।
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।। १ ।।
पुरणपोळीचा नैवेद्य दावूं । सुवासिनींना भोजन देऊं ।
चणे हळदीकुंकू दूधहि देऊं । जमूनि आनंदे आरती गाऊं ।
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।। २ ।।
सटवीची बाधा होई बाळांना । सोडवी तींतून तूचि तयांना ।
माता यां तुजला करिती प्रार्थना । पूर्ण ही करी मनोकामना ।
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।। ३ ।।
तुझिया कृपेने सौख्य नांदू दे । वंशाचा वेल नीट वाढूं दे ।
सेवा हे व्रत नित्य घडूं दे । मनींचे हेतू पूर्ण होऊंदे ।
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।। ४ ।।