16 नोव्हेंबर रोजी सूर्य होतोय गोचर, मिळणार या राशींना फायदा
सूर्याला ग्रहांचा राजा मानलं जातं. सूर्याशिवाय कोणत्याही प्राण्याचे जीवन शक्य नाही. सूर्य स्वभावाने पुरुष ग्रह असून नेतृत्व क्षमता दर्शवतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मेष किंवा सिंह राशी मजबूत स्थितीत असते तेव्हा त्याला त्याच्या कुटुंबात आणि करिअरमध्ये अनेक फायदे मिळतात. हा सूर्य नोव्हेंबर महिन्यात गोचर होणार आहे आणि त्याचा कोणत्या राशींना फायदा मिळणार आहे हे आपण ज्योतिषाचार्य समीर मणेरीकर यांच्याकडून जाणून घेऊया.
सूर्य देव देखील वेळोवेळी राशी बदलत असतात. या संक्रमणाचा सर्व राशींवर वेगवेगळा प्रभाव पडतो. काही लोकांचे नशीब चमकते तर काहींना नुकसान सहन करावे लागते. आता सूर्यदेव 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.16 वाजता वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत. या संक्रमणाने 5 राशींचे भाग्य उजळणार आहे. चला तुम्हाला त्या भाग्यशाली राशींबद्दल सांगूया (फोटो सौजन्य – Pinterest/iStock)
वृषभ राशीला मिळणार फायदा
सूर्य गोचरचा वृषभ राशीवर प्रभाव
तुमच्या कुंडलीच्या 7 व्या घरात सूर्य उपस्थित असेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत लांबच्या प्रवासाला जावे लागू शकते. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून आदर मिळेल. तुम्हाला पुरेशी रक्कम मिळेल, ज्यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हाल. गेल्या काही महिन्यांपासून असणारा त्रास लवकरच संपेल आणि तुम्हाला सुखाचे दिवस येतील
हेदेखील वाचा – प्रेमात आहात का? 13 नोव्हेंबर, 2024 चे Love Rashifal काय सांगते
मिथुन राशीच्या प्रयत्नांना मिळेल यश
मिथुन राशीवर सूर्य गोचराचा परिणाम
मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या प्रयत्नात यश मिळेल. तुमच्यातील धैर्य परिणाम देईल. तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुम्ही सतत उत्साही राहाल. वृश्चिक राशीत सूर्याचे भ्रमण असल्यामुळे तुमची विचारसरणी इतरांपेक्षा वेगळी असेल आणि तुमच्या कृतींवर तुमची मजबूत पकड असेल. परिणामी, आपण जास्तीत जास्त फायदे मिळविण्यास सक्षम असाल अशी सध्याची ग्रहस्थिती सांगतेय
सिंह राशीला मिळणार प्रेम
सिंह राशीवर होणारा परिणाम कसा असेल
सूर्याच्या भ्रमणामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसाल. यामुळे तुमच्या दोघांमधील नाते आणखी घट्ट होईल. मुले त्यांच्या अभ्यासात चांगली प्रगती करतील, ज्यामुळे तुम्ही आनंदी दिसाल. सूर्य वृश्चिक राशीत गेल्याने नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्या लोकांना अनेक चांगल्या संधी मिळतील. तुमच्या आर्थिक जीवनात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तसंच तुमच्या आयुष्यातील रोमान्स अधिक बळकट होईल
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना परीक्षेत यश
सूर्य गोचराचा वृश्चिक राशीवर प्रभाव
सूर्य संक्रमणाच्या प्रभावामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. त्यांना अनेक परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला नवीन ठिकाणाहून नोकरीची ऑफर लेटर्स ममिळू शकतात, ज्यामुळे तुमचे कुटुंब आनंदी राहील. तुमच्या बोलण्यात गोडवा राहील, ज्यामुळे समाजात तुमचा सन्मान वाढेल. तुम्ही चांगल्या रकमेची बचतदेखील करू शकाल. या महिन्यात तुमची भरभराट होण्याची शक्यता नाकारता येत नाही
मकर राशीला मिळणार आनंद
सूर्य गोचरामुळे मकर राशीला काय मिळणार
या राशीच्या लोकांना सूर्य संक्रमणाच्या काळात विमा, कोणतीही जुनी गुंतवणूक किंवा वडिलोपार्जित मालमत्तेतून अनपेक्षित पैसे मिळू शकतात. याद्वारे तुम्ही जुने कर्ज फेडण्यात आणि नवीन मालमत्ता जोडण्यात यशस्वी होऊ शकता. या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होऊ शकतात. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध सौहार्दाचे राहतील. तुमचे जीवन आनंदात व्यतीत होईल.
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.