फोटो सौजन्य- gemini
गुजरातमधील गिरनार पर्वत हा धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. याच पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात जटाशंकर महादेव मंदिर वसलेले आहे. दाट जंगल, डोंगर आणि शांत वातावरणाने वेढलेले हे शिवस्थान भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्र मानले जाते. गिरनार पर्वतावरील जटाशंकर मंदिराविषयी सविस्तर जाणून घेऊया
गुजरातमधील गिरनार पर्वत हा भारतातील सर्वांत प्राचीन आणि पवित्र पर्वत रांगांपैकी एक मानला जातो. या पर्वतावरती निसर्गाच्या कुशीत बसलेलं जटाशंकर महादेव मंदिर हे भगवान शिवाचं प्राचीन आणि शांत असं मंदिर मानलं जातं. येथील गुऱ्हेत शिवलिंग असून त्यावरती सतत झऱ्याच्या पाण्याने अभिषेक होत असतो.
स्थानिक परंपरेनुसार हे ठिकाण भगवान शिवांच्या जठांशी जोडले गेले आहे. जटाशंकर महादेव मंदिर हे गुजरातच्या जुनागड जिल्ह्यातील गिरनार पर्वताच्या मागील बाजूस दाट जंगल, डोंगर आणि नैसर्गिक झाडांच्या परिसरात आहे. हे मंदिर मुख्य गिरनार मंदिराच्या पायऱ्यापासून थोडं वेगळ्या दिशेला असून छोट्या ट्रेकनंतर येथो पोहोचता येतं. येथे पोहोचण्यासाठी साधारणतः एक ते दोन तासांचा प्रवास किंवा छोटासा ट्रेक नक्कीच करावा लागतो.
स्थानिक आख्यायिकेनुसार, एकदा भगवान शिव गिरनार पर्वतावरती तपश्चर्या करत होते त्यावेळी त्यांच्या जटांमधून गंगेसारखा पवित्र जलप्रवाह प्रकट झाला त्या जलधारेने खडक फोडून मार्ग तयार केला आणि ते पाणी एका गुहेत वाहू लागलं याचं ठिकाणी शिवलिंग प्रकट झालं आणि त्या सतत वाहणाऱ्या जलधारेमुळे भगवान शिवांना जटाशंकर या नावाने ओळखले जाऊ लागले. या मंदिराचा सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे येथे शिवलिंगावरती नैसर्गिक झऱ्याच पाणी अखंड वाहत राहतं. जटाशंकर महादेव परिसराला सोनरेखा नदीचं उगमस्थान देखील मानलं जातं.
श्रावण महिन्यात येथे मोठ्या प्रमाणावरती भक्तांची गर्दी असते. या काळात भक्त जलाभिषेक करतात, बेलपत्र अर्पण करतात. रुद्राष्टक आणि महामृत्यूजंय मंत्रांचा जप करतात. ओम नमः शिवायचा जप करत गुहेत ध्यान करतात. श्रावणातील प्रत्येक सोमवारी या ठिकाणी विशेष अशी पूजा केली जाते.
मंदिरात भाविक ‘ॐ नमः शिवाय’, रुद्राष्टक आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करतात. गुहेतील शांत वातावरणात ध्यान आणि नामस्मरण करण्याची परंपराही पाहायला मिळते. त्यामुळे जटाशंकर महादेव मंदिर हे केवळ दर्शनाचे ठिकाण नसून भक्ती आणि साधनेसाठीही महत्त्वाचे स्थान मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: जटाशंकर महादेव मंदिर गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील गिरनार पर्वताच्या परिसरात वसलेले आहे.
Ans: गुहेतील शिवलिंगावर नैसर्गिक झऱ्याचे पाणी सतत वाहत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अखंड जलाभिषेक होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
Ans: स्थानिक मान्यतेनुसार, मंदिराचा परिसर सोनरेखा नदीच्या उगमस्थानाशी संबंधित आहे.






