Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तिरुपती बालाजी मंदिरात केस दान का करतात? जाणून घ्या कथा

तिरुपती बालाजी हे जगातील एकमेव मंदिर आहे जिथे लोक मुंडण करायला येतात. पुरुष, महिला आणि मुले सर्वच येथे केस दान करतात. येथे लोक आनंदाने त्यांचे सुंदर केस का दान करतात. त्यामागील पौराणिक कथा, त्याचे महत्त्व जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 21, 2024 | 12:16 PM
फोटो सौजन्य- फेसबुक

फोटो सौजन्य- फेसबुक

Follow Us
Close
Follow Us:

तिरुपती बालाजी मंदिराचा प्रसाद सध्या चर्चेचा विषय बनला आहे. मंदिरात उपलब्ध असलेल्या खास लाडूंमध्ये तुपाऐवजी प्राण्यांची चरबी आणि माशाच्या तेलाचा वापर केल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. या वृत्तानंतर एकच खळबळ उडाली आहे. याशिवाय भाविकांच्या भावनाही दुखावल्या गेल्या आहेत. माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की, तिरुपती बालाजीचे मंदिर आंध्र प्रदेशातील चित्तूल जिल्ह्यातील तिरुपतीजवळ तिरुमाला टेकडीवर आहे. येथे भगवान विष्णूच्या व्यंकटेश्वर रूपाची पूजा केली जाते. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात.

मंदिरात केस दान का केले जातात

तिरुमला येथील तिरुपती बालाजी मंदिरात केस दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. येथे प्रत्येकजण, स्त्री-पुरुष आपले केस दान करतात. यामुळे आज आम्ही तुम्हाला त्यामागील श्रद्धा आणि पौराणिक कथा सांगणार आहोत.

हेदेखील वाचा- बुध संक्रमणामुळे या राशींचे भाग्य उजळण्याची शक्यता

असे मानले जाते की, तिरुपती बालाजी मंदिरात केस दान केल्याने व्यक्तीला कधीही पैशाची समस्या येत नाही आणि देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते. याशिवाय सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जाही जीवनातून नाहीशी होते आणि व्यक्तीच्या मनोकामनाही पूर्ण होतात.

काय आहे पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार, एकदा मुंग्यांचा एक मोठा कळप भगवान व्यंकटेश्वराच्या मूर्तीवर चढला आणि तो डोंगरासारखा दिसू लागला. रोज एक गाय त्या डोंगरावर यायची आणि दूध देऊन निघून जायची. टेकडीवर गाय दूध देत असल्याचे गाईच्या मालकाला कळताच त्याने रागाने गायीवर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात भगवान व्यंकटेश्वराच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्यांचे केसही पडले.

हेदेखील वाचा- शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी पठन करा शनि चालिसा

त्यानंतर बालाजी भगवानची आई नीला देवी यांनी केस कापून बालाजीच्या डोक्यावर ठेवले त्यामुळे त्यांची जखम पूर्णपणे बरी झाली. जखम बरी झाल्यानंतर भगवान व्यंकटेश्वर प्रसन्न झाले आणि म्हणाले की, केसांमुळे शरीराचे सौंदर्य वाढते आणि तुम्ही माझ्यासाठी ते बलिदान दिले. आजपासून जो कोणी माझ्यासाठी केसांचा त्याग करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तेव्हापासून तिरुपती मंदिरात भाविक केस दान करत आहेत.

दान केलेल्या केसांचे काय होते?

दरवर्षी लाखो किलो केस तिरुपती बालाजी मंदिरात दान केले जातात. केस उकडलेले, धुऊन वाळवले जातात आणि योग्य तापमानात साठवले जातात. या प्रक्रियेने केस स्वच्छ आणि नीटनेटके राहतात. केसांची विक्री ई-ऑक्शनद्वारे केली जाते. हा ऑनलाईन लिलाव तिरुमला तिरुपती देवस्थानमने आयोजित केला आहे. केसांच्या लिलावातून कोट्यवधी रुपयांचा निधीही जमा होतो. युरोप, अमेरिका, चीन, आफ्रिकेसह अनेक ठिकाणी या केसांना मोठी मागणी आहे.

Web Title: Tirupati temple know why people donate their hair at tirupati balaji temple

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2024 | 12:16 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.