फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळवार, 12 ऑगस्टचा दिवस खूप खास आहे. या दिवशी शनि मीन राशीत राहील आणि युरेनस वृषभ राशीत असेल. ज्यावेळी हे दोन्ही ग्रह 60 अंशांच्या कोनात येतात त्यावेळी एक विशेष खगोलीय संयोग तयार होतो, ज्याला त्रिएकदश योग म्हणतात. हा दुर्मिळ योग काही निवडक राशींसाठी खूप शुभ संकेत घेऊन येणार आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार या योगाला नशीब बळकट करणारा असे मानले जाते. तसेच त्याचा ज्या राशीच्या लोकांवर परिणाम होतो त्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती देखील सुधारते, असे देखील म्हटले जाते. या काळात संपत्ती मिळण्याची, करिअरमध्ये वाढ होण्याची आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता असते. तसेच तुम्हाला नशिबाची देखील साथ मिळते. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या
त्रैकादश योग कर्क राशीच्या लोकांसाठी आनंददायी असणार आहे. तुमची दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी उपलब्ध होतील. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून बढती आणि कौतुकाची थाप मिळू शकते. यावेळी तुम्हाला आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. जोडीदारासोबतचे नाते चांगले राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीने तुमचे वरिष्ठ प्रभावित होतील. सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता.
वृश्चिक राशीच्या लोकांना त्रैकादश योगाचा सकारात्मक फायदा होणार आहे. पालकांशी संबंध सुधारतील. उत्पन्नामध्ये वाढ होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप चांगला राहील. तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये प्रगती होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना प्रवासातून अपेक्षित लाभ मिळू शकतो. या काळात तुमची बचत वाढेल. व्यवसायात नफा होऊ शकतो. तसेच तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. तुम्ही घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करु शकता. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकते. प्रगतीची संधी आहे.
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर असणार आहे. तुम्हाला काही मोठे यश मिळेल. व्यवसायामध्ये वाढ होईल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा मिळेल. वडिलोपार्जित मालमत्तेचाही तुम्हाला फायदा होऊ शकतो. आरोग्य चांगले राहील. तुमच्या बोलण्यात गोडवा राहील. सामाजिक आदर आणि प्रतिष्ठा वाढेल ज्यामुळे तुमच्यामधील आत्मविश्वास देखील वाढेल. समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा वाढेल. तुम्ही घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करु शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)