Vastu Tips: इतरांकडून चुकूनही उधार घेऊ नका 'या' वस्तू; घराच्या सुख शांतीवर होऊ शकतो परिणाम

Vastu Tips: घरातील सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहे. या नियमांमध्ये काही वस्तूंचा देखील उल्लेख केलेला आहे. ज्यामध्ये इतरांना उधार देणे किंवा उसने घेणे अशुभ मानले जाते. या वस्तूंची देवाणघेवाण केल्याने जीवनातील नकारात्मकता आणि अडचणी वाढू शकतात
इतरांकडून चुकूनही उधार घेऊ नका 'या' वस्तू
इतरांकडून चुकूनही उधार घेऊ नका 'या' वस्तू
Published on: 
Updated on: 
  • काही वस्तू इतरांकडून उधार घेणे टाळावे

  • इतरांकडून चुकूनही उधार घेऊ नये या वस्तू

  • घराच्या सुख समृद्धीवर होतो परिणाम

Vastu Tips: घरातील सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहे. या नियमांमध्ये काही वस्तूंचा देखील उल्लेख केलेला आहे. ज्यामध्ये इतरांना उधार देणे किंवा उसने घेणे अशुभ मानले जाते. या वस्तूंची देवाणघेवाण केल्याने जीवनातील नकारात्मकता आणि अडचणी वाढू शकतात.

ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार, विशिष्ट वस्तूंच्या देवाणघेवाणीबद्दल काही विशिष्ट समजुती आहेत. असे मानले जाते की प्रत्येक वस्तूचा स्वतःचा एक ऊर्जात्मक प्रभाव असतो, जो व्यक्तीच्या जीवनावर आणि त्यांच्या घरातील वातावरणावर परिणाम करू शकतो. याच कारणामुळे, काही विशिष्ट वस्तू उधार घेणे किंवा देणे अशुभ मानले जाते. असे केल्याने घरातील शांतता, आनंद आणि आर्थिक परिस्थितीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वास्तुशास्त्रात इतरांकडून या गोष्टी उधार न घेण्याचा सल्ला दिला जातो. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घ्या

मनगटावरील घड्याळ

घड्याळ हे वेळ, नशीब, प्रगती आणि जीवनाच्या गतीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे, आपले मनगट्यावरील घड्याळ दुसऱ्या कोणाला देणे किंवा दुसऱ्याचे घड्याळ घालणे अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, ज्यावेळी तुम्ही तुमचे घड्याळ दुसऱ्या कोणाला देता, त्यावेळी तुम्ही तुमची ऊर्जा आणि शुभ काळसुद्धा त्यांना देत असता. त्याचप्रमाणे, दुसऱ्याचे घड्याळ घातल्याने त्यांची शुभ किंवा अशुभ ऊर्जा तुमच्या जीवनात येऊ शकते.

झाडू

तुम्ही तुमचा घरातील झाडू कधीही दुसऱ्या कोणालाही देऊ नये, कारण असे केल्याने लक्ष्मी तुमचे घर सोडून जाईल. तुम्ही त्यांना नवीन झाडू विकत घेऊ शकता, पण तुमचा झाडू कधीही देऊ नका. वास्तूनुसार, झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. दुसऱ्याचा झाडू वापरल्याने त्यांच्या घरातील नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात येऊ शकते, ज्यामुळे आर्थिक समस्याही वाढू शकतात.

रुमाल

रुमालाचे महत्त्व शुभ आणि अशुभ नशिबाशी जोडलेले आहे. तो व्यक्तीच्या वैयक्तिक भावना आणि मानसिक स्थितीची ऊर्जा शोषून घेतो. वास्तुशास्त्रानुसार, जेव्हा तुम्ही तुमचा रुमाल कोणाला देता किंवा दुसऱ्याचा वापरता, तेव्हा त्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्येही संक्रमित होऊ शकते. त्याचप्रमाणे, कोणालाही रुमाल भेट म्हणून देऊ नये. असे मानले जाते की यामुळे नातेसंबंध बिघडू शकतात.

पांढऱ्या रंगांचे खाद्य पदार्थ

पांढरे खाद्यपदार्थ शांत ऊर्जा आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात. वास्तुशास्त्रानुसार, दूध, दही, तांदूळ, मीठ इत्यादी पांढरे खाद्यपदार्थ संध्याकाळच्या वेळी दुसऱ्याला देणे अशुभ मानले जाते, कारण ही ऊर्जा परिवर्तनाची वेळ असते. संध्याकाळी हे पदार्थ घराबाहेर पाठवल्याने कुटुंबाची समृद्धी कमी होऊ शकते आणि आर्थिक समस्या वाढू शकतात. त्यामुळे, अशा वस्तूंची देवाणघेवाण सकाळी किंवा दुपारी करणे उत्तम ठरते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)