फोटो सौजन्य- istock
वास्तूशास्त्रामध्ये किचन, बेडरुम, वॉशरुम, लिव्हिंग रूमसह सर्व खोल्यांसाठी महत्त्वाच्या वास्तु टिप्स दिल्या आहेत. असे मानले जाते की, वास्तूच्या या नियमांचे पालन केल्याने घरात सकारात्मकता येते.
हिंदू धर्मामध्ये वास्तूच्या नियमांचे पालन करणे महत्त्वपूर्ण मानले गेले आहे. असे मानले जाते की, वास्तू जेव्हा गोष्टी व्यवस्थित असतात तेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा संचारते आणि जीवनात सुख, समृद्धी आणि समृद्धी येते. वास्तूशास्त्रानुसार, किचन, बेडरुम, वॉशरुम, लिव्हिंग रूमसह स्टोर रुमच्या वास्तूच्या नीगडीत काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. ज्या वस्तूंचा वापर कमी असतो त्याला एका विशिष्ट ठिकाणी ठेवले जाते त्याला स्टोर रुम असे म्हटले जाते. घरात या रुमलासुद्धा महत्त्व आहे. स्टोर रुमच्या वास्तूबद्दल जाणून घेऊया.
हेदेखील वाचा- परिवर्तनिनी एकादशीला हे सोपे उपाय करुन बघा, आर्थिक लाभाची शक्यता
स्टोर रुमची वास्तू
ईशान्य (उत्तर पूर्व दिशा), आग्नेय (पूर्व- दक्षिण दिशा) आणि दक्षिण दिशेला वास्तू बांधू नये. असे मानले जाते की, यामुळे घरातील नकारात्मकता वाढते.
वास्तूशास्त्रानुसार, स्टोर रुम जास्त मोठे असू नये त्याचा आकार छोटाच असावा.
स्वयंपाकघरातील स्टोअर रूम देखील नैऋत्य दिशेला बांधावी.
हेदेखील वाचा- शनिदेवाच्या आशीर्वादाने मूलांक 5 असणारे लोक चतुराईने पैसे कमावण्याची शक्यता
वास्तूमध्ये पायऱ्यांच्या खाली आणि ब्रह्म स्थानावर स्टोअर रूम बांधणे शुभ मानले जात नाही.
वास्तूशास्त्रानुसार, बेडरुममध्ये कोणत्याही प्रकारच्या स्टोअर रूमच्या वस्तू ठेवू नयेत.
याशिवाय स्टोर रुमच्याल स्वच्छतेची विशेष काळजी घ्या, येथे कोणतीही घाण पसरू देऊ नका.
स्टोर रुमचा रंग
जर खोली उत्तर-पश्चिम दिशेला असेल तर त्याच्या भिंती क्रीम रंगाने रंगवल्या जाऊ शकतात. दक्षिण-पश्चिमेला असलेल्या स्टोअर रूमसाठी हलका पिवळा रंग चांगला पर्याय आहे.
लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
उत्तर-पूर्व किंवा पूर्व दिशेला स्टोअर रूम बांधू नका.
शक्यतो स्टोअर रुममध्ये फक्त त्या वस्तू ठेवा ज्याची तुम्हाला गरज आहे. अनावश्यक आणि निरुपयोगी वस्तूंनी ते भरून ठेवू नका. याशिवाय वेळोवेळी त्याची स्वच्छता करत राहा.
माल साठवण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही कामासाठी स्टोअर रूम वापरू नका.
प्रकाश आणि हवा व्यवस्थापन
धान्यासह अनेक प्रकारचा माल स्टोअर रूममध्ये जास्त काळ ठेवल्यास ते खराब होण्याची शक्यता वाढते. या परिस्थितीत वस्तूंची शुद्धता राखण्यासाठी या खोलीत प्रकाश आणि हवेची पुरेशी व्यवस्था असणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे वस्तू जास्त काळ शुद्ध तर राहतीलच शिवाय खोलीत सकारात्मक ऊर्जेचा प्रवाहही कायम राहील.