फोटो सौजन्य- istock
हिंदू मान्यतेनुसार, जेव्हा विनायक चतुर्थी तिथी शुक्ल पक्षात येते त्याला विनायक चतुर्थी असे म्हटले जाते. श्रावण महिन्यात विनायक चतुर्थी व्रत 8 ऑगस्ट रोजी ठेवले जाणार आहे. ऑगस्ट महिन्यातील व विनायक चतुर्थी व्रत शिव, सिद्ध आणि रवि योग यांच्या संयोगाने ठेवले जाईल.
हेदेखील वाचा- कपाळावर कोणत्या दिवशी कोणते टिळक लावायचे ते जाणून घेऊया
बुधवार, 7 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजून 5 मिनिटांनी सुरु होईल आणि या तिथीची समाप्ती 9 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजून 36 मिनिटांनी होईल. उद्यतिथीनुसार, विनायक चतुर्थीचे व्रत आज गुरुवार, 8 ऑगस्टला पाळले जाणार आहे. विनायक चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश पूजेची वेळ सकाळी 11 वाजून 7 मिनिटांपासून दुपारी 1 वाजून 46 मिनिटांपर्यंत असेल. पूजेसाठी लोकांना फक्त 2 तास 40 मिनिटांचा कालावधी मिळेल. चंद्रोद्याची वेळ रात्री 8 वाजून 59 मिनिटांनी आहे. या दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध आहे.
या शुभ तिथीला विधीनुसार गणपतीची पूजा केल्याने लोक इच्छित आशीर्वाद मिळतात आणि घरामध्ये संपत्तीसोबतच सुख समृद्धी टिकून राहते. याशिवाय आयुष्यात येणारी दु:खं दूर होतात. विनायक चतुर्थीच्या दिवशी विधिवत पूजेवेळी या मंत्राचा जप नक्की करा. या मंत्राचा जप केल्याने जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळते आणि घरात सुख-समृद्धी टिकून राहते.
हेदेखील वाचा- वैवाहिक जीवनात गोडवा हवायं, जाणून घ्या चाणक्य नीती
विनायक चतुर्थीची पूजा पद्धत
विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान वगैरे करुन लाल रंगाचे कपडे घाला.
सकाळी सर्वांत पहिले उगवत्या सूर्याला तांब्याच्या भांड्यातून अर्घ्य अर्पण करून व्रत करावे.
गणपतीच्या मंदिरात प्रसाद म्हणून नारळ आणि मोदक घ्या.
त्यानंतर गुलाबाचे फूल आणि दुर्वा अर्पण करा आणि ओम गं गणपतये नमः मंत्रांचा 27 वेळा जप करा आणि अगरबत्ती अर्पण करा.
दुपारच्या पूजेच्या वेळी, आपल्या घरी, आपल्या क्षमतेनुसार पितळ, तांबे, माती अथवा सोने किंवा चांदीपासून बनवलेल्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करा.
संकल्पानंतर गणपतीची पूजा व आरती करून मुलांना मोदक वाटप करावेत.
विनायक चतुर्थीला भगवान श्रीगणेशाकडून इच्छित वरदान मिळण्यासाठी लोकांनी दिवसभर उपवास ठेवावा आणि पूर्ण विधीपूर्वक त्यांची दोनदा पूजा करावी.
गणपती भक्ताला एकदा दुपारी आणि दुसऱ्यांदा गजाननाची पूजा करावी लागणार आहे.
श्रीगणेशाच्या मंत्राचा किमान एक जप जप करा, यामुळे गणेशोत्सवानिमित्त तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल.
विनायक चतुर्थीचे महत्त्व
हिंदू मान्यतेनुसार, जो भक्त श्रावण महिन्याच्या विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीला लाल रंगाचे फूल, दुर्वा, पान, सुपारी, मोदक किंवा मोतीचूरचा लाडू अर्पण करून त्याची पूजा करतात त्याच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होतात. गणपतीच्या आशीर्वादाने शक्ती, बुद्धी, आनंद आणि सौभाग्य यांचे आशीर्वाद मिळतात. गणपतीच्या कृपेने त्यांची सर्व कामे पूर्ण होतात. याशिवाय घरात सुख-समृद्धी राहते आणि जीवनातील संकटांपासून मुक्ती मिळते.