
फोटो सौजन्य- pinterest
शनि ग्रह, न्यायाधीश, व्यक्तींना त्यांच्या कर्मांनुसार फळ देतो असे मानले जाते. शनि 138 दिवसांपासून मीन राशीत वक्री आहे. आता शुक्रवार, 28 नोव्हेंबर रोजी तो मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनिच्या या होणाऱ्या हालचालींचा प्रत्येक राशींच्या लोकांवर विपरित परिणाम होणार आहे. शनिच्या होणाऱ्या हालचालीमुळे विप्रीत राज योग तयार होणार आहे. त्याचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहे. नोव्हेंबरमध्ये शनिची होणारी हालचाल आणि विप्रीत राजयोग याचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या
ज्यावेळी शनि आपली वक्री अवस्था सोडून थेट वळतो तेव्हा विप्रीत राजयोग तयार होतो. हा योग प्रतिकूल परिस्थितीतही यश आणि समृद्धी प्रदान करतो. या योगाचा प्रभाव ज्या राशीच्या लोकांवर पडतो त्या राशीच्या लोकांना अचानक चांगल्या संधी आणि आर्थिक लाभ मिळतात.
सिंह राशीच्या आठव्या घरात शनि प्रवेश करणार आहे. शनिच्या या प्रवेशामुळे सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील. तुमच्या पदाची पदोन्नती होईल. बढतीमुळे तुमचा पगारही वाढेल. या काळामध्ये वैवाहिक जीवनात सुरु असलेल्या समस्या दूर होण्यास मदत होईल. वैवाहिक जीवनातील समस्याही संपतील.
धनु राशीच्या चौथ्या घरात शनि प्रवेश करणार आहे. विप्रीत राजयोगाचा परिणाम धनु राशीच्या लोकांवर सकारात्मक होणार आहे. जे लोक व्यवसायामध्ये वाढ करु इच्छित आहात त्यांच्यासाठी हा काळ खूप शुभ असणार आहे. तुम्हाला यश मिळेल. या काळात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. घर, मालमत्ता किंवा कार खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होतील. कुटुंबात सुख-शांती वाढेल.
शनि मीन राशीच्या लोकांच्या घरात आहे. कारण सध्या शनि मीन राशीमध्ये स्थिर आहे. शनिच्या हालचालींचा मीन राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. करिअरसाठी हा काळ अनुकूल राहील. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि तुमचे आरोग्य देखील चांगले राहील. गुंतवणुकीतून अपेक्षित फायदा मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: विप्रीत राजयोग 28 नोव्हेंबर रोजी तयार होणार आहे
Ans: या योगाचा सिंह, धनु आणि मीन राशीच्या लोकांना होणार फायदा
Ans: शनि मीन राशीमध्ये स्थित आहे