फोटो सौजन्य - Social Media
हिंदू धर्मात मूलांकांना फार महत्व आहे. एखाद्या व्यक्तीच्या वृत्तीबद्दल तसेच त्या व्यक्तीबद्दल संपूर्ण जाणून घेण्यासाठी मूल्यांक फार महत्वाचे ठरतात. मूलांक एक अंक असतो. व्यक्तीच्या जन्मतारखेतुन मिळणार अंक, त्या व्यक्तीच्या संदर्भातील अनेक गोष्टींचा खुलासा करतो. एकंदरीत, हा अंक त्या व्यक्तीच्या जीवनाच्या संबंधित असतो. हा अंक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची, आयुष्याच्या ध्येयाची आणि त्यांच्या संबंधांच्या स्वरूपाची माहिती देतो. भारतामध्ये बहुतेक ठिकाणी या गोष्टीनावर विश्वास ठेवला जातो. तर बरेच लोकं या गोष्टींना मानत नाही. परंतु, असे म्हणतात कि यातून निघणाऱ्या अनेक बाबी या सत्य असतात. भारतीय अंकशास्त्रानुसार, मूलांक १ ते ९ पर्यंतच्या अंकांचे विशिष्ट अर्थ आहेत. आपल्या जन्मतारखेवरून आपले मूलांक शोधणे सोपे जाते.
हे देखील वाचा : लक्ष्मीपूजनाच्या वेळी लक्ष्मीची आरती करावी की नाही? जाणून घ्या पूजेची योग्य पद्धत
कोणत्याही महिन्याच्या १ तारखेला जन्मास आलेल्या व्यक्तीचा मूल्यांक हा १ असतो. तर समजा एखादा व्यक्ती २९ तारखेला जन्माला आला असेल तर त्याचा मूल्यांक ‘२+९=११, १+१=२’ असा होतो. म्हणजेच २९ तारखेला जन्मास आलेय व्यक्तीचा मूलांक २ आहे. अशा प्रकारे, आपल्या जन्मतिथीनुसार आपण आपले मूलांक माहिती करून घेऊ शकतो.
मूलांक १ : स्वातंत्र्य, नेतृत्व क्षमता आणि आत्मविश्वास अगदी भरभरून असलेले हे लोकं सूर्याच्या प्रभावाखाली असतात. आव्हाने स्वीकारणे म्हणजे यांचा छंदच! आयुष्यात यश मिळवण्यासाठी धडपड करत असतात. त्यांची प्रेमजीवन प्रगल्भ आणि संघर्षशील असते, कारण त्यांना सहसा त्यांच्या जोडीदाराकडून आदर आणि समर्पणाची अपेक्षा असते. मूलांक २ असणाऱ्या व्यक्तींशी यांची जोडी छान जमते.
मूलांक २ : ज्या लोकांचा मूलांक २ असतो, ते चांगले सहकारी असतात. सतत इतरांना मदत करण्याची भावना त्यांच्यामध्ये असते. त्यांच्यात संवेदनशीलता, सुसंवाद आणि प्रेमाची मोठी क्षमता असते. इतरांच्या भावना जपणे, त्यांचा आदर करणे आणि सहानभूती दाखवणे असे यांचे प्रमुख वागणे असते.
मूलांक ३ : मूलांक ३ असणाऱ्या लोकांमध्ये संवाद कौशल्य उत्तम असते. ते सतत आनंदी आणि उत्साही असतात. त्यांचा सहवास अनेकांना आवडतो. या अंकाच्या लोकांमध्ये सृजनशीलता असते.
मूलांक ४ : मूलांक ४ असलेले व्यक्ती मेहनती आणि व्यावसायिक असतात. त्यांना शिस्तीने चणे फार आवडते. त्यांना सुरक्षितता फार महत्वाची असते.
मूलांक ५ : मूलांक ५ असलेले लोक नेहमी नवीन अनुबझावाच्या शोधात असतात. त्यांच्यामध्ये साहस भरभरून असतो. त्यांना आपले जीवन स्वातंत्र्यरित्या जगण्यास आवडते.
मूलांक ६ : कुटुंबासाठी आणि घरातील सुखासाठी नेहमी पुढे असणारे ही लोकं फार प्रेमळ असतात. याच्या मनात प्रेमासाठी सॉफ्ट कॉर्नर असतो. निसर्गाची जपणूक करण्यात यांना विशेष रस असतो.
मूलांक ७ : मूलांक ७ असलेले लोक अंतर्मुख, साधक आणि तात्त्विक विचार करणारे असतात.
मूलांक ८ : ८ मूलांक असणारी मंडळी मेहनती असतात. यश प्राप्त करणे त्यांच्या जीवनाचा उद्देश असतो. ते दीर्घकालीन यशावर लक्ष केंद्रित करतात.
मूलांक ९ : मूलांक ९ असलेल्या व्यक्ती समाजसेवी आणि मानवतावादी असतात. समाजाची सेवा करणे त्यांचा महत्वाचा छंद असतो. माणुसकी हा त्यांचा मुख्य धर्म असतो.
या सर्व मूलांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाच्या विशेषता आहेत, ज्यामुळे प्रत्येक व्यक्ती अद्वितीय असते. मूलांकाचे महत्त्व आपल्याला आपल्या जीवनातील दिशा, उद्दिष्टे आणि संबंधांच्या विकासात जाणून घेण्यात मदत करते.