Tulsi (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
पुराणात सांगतात की तुळशीचे लग्न शंखचूड नावाच्या असुराबरोबर झाले होते. हा शंखचूड सामान्य राक्षस नव्हता, खूप ताकदवर होता. त्याला हरवणे देवांनाही कठीण गेले होते. शेवटी देवी दुर्गेनेच त्याचा वध केला.आपल्या पतीला मारणारी देवी म्हणून तुळशीच्या मनात दुर्गेबद्दल नाराजी राहिली. तिला दुर्गेचा राग येतो असे मानले जाते. म्हणूनच तुळस कधीच दुर्गा देवीजवळ जात नाही. ही भावना आजही पाळली जाते. Tulsi and Goddess Durga:
तुळशीला विष्णूची पत्नी मानले जाते. तिला विष्णूप्रिया किंवा वैष्णवी असेही म्हणतात. त्यामुळे जिथे विष्णूची पूजा होते, जसे की विठ्ठल, कृष्ण, राम यांच्या पूजेत तुळस आवर्जून लागते.
Gardening Tips: तुळशीचे रोप वारंवार सुकून जातंय? ‘या’ पद्धतीने घ्या …
पण दुर्गा देवी ही शक्ती आहे, ती शैव पंथाशी जोडलेली आहे. शैव आणि वैष्णव या दोन वेगळ्या परंपरा आहेत. त्यामुळे वैष्णव असलेली तुळस शक्तीच्या पूजेत वापरली जात नाही. म्हणूनच जसे महादेवाला तुळस वाहत नाही, तसेच दुर्गा मातेला पण वाहत नाही. गणपती, शनीदेव, भैरव यांनाही तुळस वाहत नाहीत.
काही ग्रंथात असेही लिहिले आहे की एकदा तुळशीने दुर्गा देवीला शाप दिला होता. ती म्हणाली होती की तुझ्या पूजेत माझा कधीच वापर होणार नाही. त्यामुळेच परंपरेने दुर्गा पूजेत तुळस वर्ज्य झाली.
घरामध्ये तुळशीची योग्य दिशा कोणती? | Navarashtra – Marathi News
शक्तीच्या पूजेचे काही नियम आहेत. ज्या वस्तूचा संबंध असुराशी आहे, ती वस्तू देवीला अर्पण करत नाहीत. तुळशीचा संबंध शंखचूड असुराशी आल्यामुळे ती अपवित्र नाही, पण देवीच्या पूजेसाठी योग्य मानली गेली नाही.त्यामुळे नवरात्रीत देवीला फुले म्हणून झेंडू, गुलाब, कमळ, जास्वंद वाहतात, पण तुळशीचे पान चुकूनही ठेवत नाहीत.तुम्ही पण या नवरात्रीत पूजा करताना ही गोष्ट लक्षात ठेवा. तुळस ही विष्णूसाठी ठेवा आणि देवीसाठी दुसरी पवित्र फुले वापरा.






