इतिहासामध्ये नेमकं काय घडलं याबाबत प्रत्येकाला उत्सुकता असते. पण इतिहास म्हणजे केवळ प्रेमकहाणी, युद्ध हेच नाही. तर प्रत्येक दिवसाला एक वेगळं महत्त्व असतं. आम्ही या लेखातून १५ जून या दिवसाला इतिहासामध्ये नेमकं काय काय घडलं आणि या दिवसाला काय महत्त्व आहे हे तुम्हाला सांगणार आहोत. टाकूया एक नजर (फोटो सौजन्य – iStock)
जागतिक पवन दिवस
आजच्या दिवशी जागतिक पवन दिवस साजरा केला जातो. जगामधील पवनऊर्जा आणि त्याचा वातावणावर काय काय परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी आणि त्याबाबत अधिक जागरूकता पसरविण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. नवी, उत्तम ऊर्जा कशी मिळवावी यासाठीदेखील हा दिन साजरा करण्यात येतो.
वर्ल्ड एल्डर अब्युज अवेअरनेस डे (WEAAD)
मोठ्या माणसांना होणारी शिवीगाळ, त्यांना होणारा त्रास आणि त्यांच्याकडे होणारे दुर्लक्ष अथवा त्यांनी दिली जाणारी चुकीची वागणूक याबाबत अधिक जागरूकता येण्यासाठी हा वर्ल्ड एल्डर अब्युज अवेअरनेस डे (WEAAD) साजरा केला जातो. मोठ्यांचे हक्क अबाधित राहावेत आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी हा दिवस जगभरात साजरा होतो.
1908 – जगातील सर्वात जुने स्टॉक एक्स्चेंज
15 जून, 1908 मध्ये आशिया खंडातील जगातील सर्वात जुने स्टॉक एक्स्चेंज कोलकाता येथे सुरू झाले होते. तुम्हाला माहीत आहे का हे? बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजनंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जुने स्टॉक एक्स्चेंज मानले जाते. 1836 मध्ये ब्रोकर्सचा व्यवसाय सुरू झाला होता. मात्र काम करण्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचे डोक्यावर छत नव्हते. त्यावेळच्या पालिकेने 150 सभासदांसह याची स्थापना केली होती.
1947 – ऑल इंडिया काँग्रेसने स्वीकारली विभाजनाची योजना
15 जून रोजी या दिवशी नवी दिल्लीमध्ये भारताच्या विभाजनाकरिता ब्रिटिशांची योजना ऑल इंडिया काँग्रसने स्वीकारली होती. यानंतरच भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली होती. भारताच्या फाळणीसाठी ब्रिटीश सरकारद्वारे देण्यात आलेल्या अटी आणि शर्ती ब्रिटीश इंडियाद्वारे स्वीकारण्यात आल्या होत्या.