Mahatma Phule Punyatithi: आज महात्मा जोतिराव फुले यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २८ नोव्हेंबरचा इतिहास

Mahatma Phule Punyatithi: आज महात्मा जोतिराव गोविंदराव फुले यांची पुण्यतिथी आहे. त्यांनी स्त्री-शिक्षणाची दारे खुली करत १८४८ मध्ये भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि समतेचा नवा विचार रुजवला.
Mahatma Phule
फोटो सौजन्य - सोशल मीडिया Mahatma Phule
Published on: 
Updated on: 

आज महात्मा जोतिराव गोविंदराव फुले यांची पुण्यतिथी आहे. ते महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, थोर समाजसुधारक आणि विचारवंत होते. त्यांनी स्त्री-शिक्षणाची दारे खुली करत १८४८ मध्ये भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि समतेचा नवा विचार रुजवला. शेतकऱ्यांच्या दुःखाची आणि शोषणाची जाणीव करून देत त्यांनी 'सत्यशोधक समाज' स्थापून अंधश्रद्धा व विषमतेविरुद्ध आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचे 'गुलामगिरी' आणि 'शेतकऱ्याचा असूड' हे ग्रंथ आजही सामाजिक न्यायासाठी दिशादर्शक ठरतात.

२८ नोव्हेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1814: द टाइम्स ऑफ लंडन हे वाफेवर चालणाऱ्या प्रिंटिंग प्रेसवर तयार होणारे पहिले वृत्तपत्र बनले, जे कोएनिग आणि बाऊरच्या जर्मन संघाने तयार केले.

  • 1821: पनामाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.

  • 1938: प्रभात चा माझा मुलगा हा चित्रपट रिलीज झाला.

  • 1960: मॉरिटानियाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.

  • 1964: नासाचे मरिनर-4 यान मंगळाच्या मोहिमेवर प्रक्षेपित झाले.

  • 1966: मिशेल मिकोम्बेरो यांनी बुरुंडीची राजेशाही उलथून टाकली आणि स्वतःला पहिले राष्ट्राध्यक्ष बनवले.

  • 1967: जोसेलिन बेल बर्नेल आणि अँटनी हेविश यांनी पल्सार तार्‍यांचे अस्तित्त्व सर्वप्रथम सिद्ध केले.

  • 1975: पूर्व तिमोरला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले.

  • 1983: स्पेस शटल कोलंबिया STS-9 वर प्रक्षेपित झाले, युरोपियन स्पेस एजन्सीचे स्पेसलॅब मॉड्यूल वाहून नेणारी पहिली मोहीम

  • 1991: दक्षिण ओसेशियाने जॉर्जियापासून स्वातंत्र्य घोषित केले.

  • 2000: महान तेलगू कवी गुर्राम जोशुआ यांच्या नावाचा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर झाला.

Mahatma Phule
Chandrakant Patil Decision: शासनाचा अनोखा उपक्रम! एकल मातांच्या पाल्यांना उच्च शिक्षणात मिळणार....

२८ नोव्हेंबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1853: ‘हेलन व्हाईट’ – डॉक्टरेट मिळवणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला यांचा जन्म. (मृत्यू: 28 ऑक्टोबर 1944)

  • 1857: ‘अल्फान्सो (बारावा)’ – स्पेनचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 25 नोव्हेंबर 1885)

  • 1872: ‘रामकृष्णबुवा वझे’ – गायक नट यांचा जन्म. (मृत्यू: 5 मे 1943)

  • 1922: ‘के. मी मैमीन मप्पालाय’ – भारतीय उद्योगपती यांचा जन्म.

  • 1964: ‘मायकल बेनेट’ – भारतीय अमेरिकन वकील आणि राजकारणी यांचा जन्म.

  • 1988: ‘यामी गौतम’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.

Mahatma Phule
AI in Polytechnic: तंत्रशिक्षण मंडळाचे विद्यार्थ्यांसाठी मोठे पाऊल! अभ्यासक्रमात केले 'हे' नवीन बदल

२८ नोव्हेंबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1853: ‘हेलन व्हाईट’ – डॉक्टरेट मिळवणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला यांचा जन्म. (मृत्यू: 28 ऑक्टोबर 1944)

  • 1857: ‘अल्फान्सो (बारावा)’ – स्पेनचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 25 नोव्हेंबर 1885)

  • 1872: ‘रामकृष्णबुवा वझे’ – गायक नट यांचा जन्म. (मृत्यू: 5 मे 1943)

  • 1922: ‘के. मी मैमीन मप्पालाय’ – भारतीय उद्योगपती यांचा जन्म.

  • 1964: ‘मायकल बेनेट’ – भारतीय अमेरिकन वकील आणि राजकारणी यांचा जन्म.

  • 1988: ‘यामी गौतम’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.