29 November Dinvishesh: आज माधव त्र्यंबक पटवर्धन यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २९ नोव्हेंबरचा इतिहास..

29 November Dinvishesh: आज मराठी साहित्यातील अत्यंत श्रेष्ठ कवी, समीक्षक आणि व्यासंगी भाषाशास्त्रज्ञ माधव त्र्यंबक पटवर्धन यांची पुण्यतिथी आहे, जे साहित्यविश्वात ‘माधव जूलियन’ या टोपणनावाने प्रसिद्ध आहेत.
29 November Dinvishesh
फोटो सौजन्य - नवराष्ट्र टीम
Published on: 
Updated on: 

29 November Dinvishesh: आज मराठी साहित्यातील अत्यंत श्रेष्ठ कवी, समीक्षक आणि व्यासंगी भाषाशास्त्रज्ञ माधव त्र्यंबक पटवर्धन यांची पुण्यतिथी आहे. जे साहित्यविश्वात ‘माधव जूलियन’ या टोपणनावाने प्रसिद्ध आहेत. ‘रविकिरण मंडळा’चे एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून त्यांनी आधुनिक मराठी कवितेला एक नवे आणि भावपूर्ण वळण दिले.

‘विरहतरंग’, ‘सुधारक’, ‘तुटलेले दुवे’ व ‘छंदोरचना’ यांसारख्या साहित्यकृतींसह मराठी गझलेच्या विकासात आणि ‘फारसी-मराठी कोश’ निर्मितीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. अत्यंत तरल संवेदनशीलता, प्रेमभावना आणि अभिजात भाषिक सौंदर्य ही त्यांच्या लेखनाची प्रमुख वैशिष्ट्ये मानली जातात.

२९ नोव्हेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1877 : थॉमस एडिसनने प्रथम फोनोग्राफचे प्रात्यक्षिक केले.

  • 1889 : बंगळुरूच्या लालबाग गार्डनमध्ये ‘ग्लास हाऊस’ची पायाभरणी करण्यात आली.

  • 1945 : युगोस्लाव्हिया प्रजासत्ताक बनले.

  • 1963 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी वॉरन कमिशनची नियुक्ती केली.

  • 1972 : अटारीने पोंग हा पहिला व्यावसायिकरित्या यशस्वी व्हिडिओ गेम रिलीज केला

  • 1996 : नोबेल पारितोषिक विजेत्या सामाजिक कार्यकर्त्या मदर तेरेसा यांना त्यांच्या मूळ अल्बानियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनरने सन्मानित करण्यात आले.

  • 1999 : नारायणगाव, महाराष्ट्र येथे जगातील सर्वात मोठ्या मीटरवेव्ह रेडिओ दुर्बिणीचे उद्घाटन करण्यात आले.

  • 2000 : शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खान आणि घटम वादक टी. एच. विक्कू विनायक राम यांना उस्ताद हाफिज अली खान मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  • 2000 : दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला आणि बांगलादेशच्या ग्रामीण बँकेला गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

२९ नोव्हेंबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1803 : ‘क्रिस्चीयन डॉपलर’ – ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.

  • 1849 : ‘सर जॉन अँब्रोझ फ्लेमिंग’ – ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.

  • 1869 : ‘अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर’ – समाजसेवक यांचा जन्म. (मृत्यू : 20 जानेवारी 1951)

  • 1874 : ‘अंतोनियो मोनिझ’ – नोबेल पारितोषिक विजेते सेरेब्रल एँजिओग्राफी तंत्राचे निर्माते यांचा जन्म.

  • 1907 : ‘गोपीनाथ तळवलकर’ – प्रसिद्ध लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 7 जून 2000)

  • 1908 : ‘एन. एस. क्रिश्नन’ – तमिळ चित्रपट अभिनेता यांचा जन्म.

  • 1919 : ‘जोई वीडर’ – इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेसचे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 23 मार्च 2013)

  • 1920 : ‘जोसेफ शेव्हर्स’ – स्पॅनडेक्सचे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 1 सप्टेंबर 2014)

  • 1926 : ‘प्रभाकर नारायण पाध्ये’ – लेखक, पत्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 30 ऑक्टोबर 1996)

  • 1932 : ‘जाक्स शिराक’ – फ्रान्सचे 32 वे राष्ट्रपती यांचा जन्म.

  • 1935 : ‘गुरबचन सिंग सलारिया’ – परमवीर चक्र प्राप्तकर्ता यांचा जन्म.

  • 1971 : ‘बिपलब कुमार देब’ – भारताच्या त्रिपुरा राज्याचे 10 वे मुख्यमंत्री यांचा जन्म.

  • 1977 : ‘युनिस खान’ – पाकिस्तानी क्रिकेटपटू यांचा जन्म.

29 November Dinvishesh
Mahatma Phule Punyatithi: आज महात्मा जोतिराव फुले यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २८ नोव्हेंबरचा इतिहास

२९ नोव्हेंबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1926 : ‘कृष्णाजी नारायण आठल्ये’ – ग्रंथकार, संपादक, टीकाकार, कवी व चित्रकार, केरळ कोकिळ या मासिकाचे संस्थापक व संपादक यांचे निधन.

  • 1939 : ‘माधव त्र्यंबक पटवर्धन’ – मराठी भाषेतील कवी आणि रविकिरण मंडळाचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 21 जानेवारी 1894)

  • 1950 : ‘बाया कर्वे’ – महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या पत्नी यांचे निधन.

  • 1959 : ‘गोविंद सखाराम सरदेसाई’ – मराठी इतिहासकार यांचे निधन. (जन्म : 17 मे 1865)

  • 1993 : ‘जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा’ – यांचे निधन. भारतीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक व भारतीय विमान वाहतुकीचे जनक यांचे निधन. (जन्म : 29 जुलै 1904)

  • 2001 : ‘जॉर्ज हॅरिसन’ – बीटल्स चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक यांचे निधन. (जन्म : 25 फेब्रुवारी 1943)

  • 2011 : ‘इंदिरा गोस्वामी’ – आसामी साहित्यिक व कवियत्री यांचे निधन.

29 November Dinvishesh
मुंबईत ‘MIECA 2026’चे चौथे पर्व दिमाखात संपन्न; शिक्षण-उद्योगातील २०० मान्यवर व संस्थांचा सन्मान