विमानतळाच्या बांधकामादरम्यान समोर आलं चार हजार वर्षपूर्वीचं रहस्य
ग्रीस: ग्रीस हा दक्षिण युरोपातील भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर असलेला देश आहे. ग्रीसचे स्थानिक नाव ‘हेलास’ हे आहे. प्राचीन आणि सर्वात जुनी संस्कृती लाभलेला सुंदर असा हा देश. इथली प्रत्येक शहरे ही देशाप्रमाणे आहेत. अथेन्स,स्पार्टा, थेस्पीया ही शहरे प्राचीन ग्रीसचा इतिहास सांगतात. ग्रीसमध्ये एका ठिकाणी विमानतळाच काम सुरु असताना अचानक अचंबित करणारी घटना घडली. १९ स्क्वेअर फूट मध्ये पसरलेली एक गोलाकार आकृती सापडली. ही आकृती ४००० वर्ष जुनी असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. काय आहे या आकृतीचा रहस्य याचा उलगडा अजून शास्त्रज्ञांना देखील झाला नाही.
ग्रीसच्या एका बेटावर विमानतळ बनवण्यासाठी काम सुरु होणार होते. त्यासाठी बेस बनवावा लागेल म्हणून जमिनीचं खोदकाम सुरु होत. त्यावेळी जमिनीखाली ही प्राचीन अशी गोल आकाराची आकृती दिसली. पुरातत्व शास्त्रज्ञांच्या मते ही आकृती ग्रीस च्या प्राचीन काळातील संस्कृतीशी संबंधित आहे. आणि यामुळे अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो असे म्हटले जात आहे. ग्रीकमधील आयलंड क्रेट येथे पुरातत्व शास्त्रज्ञांना एक आकृती सापडली आहे. त्यामुळे येथे तयार होत असलेल्या विमानतळाचं काम थांबवण्यात येऊ शकतं. ही आकृती मिनोअन संस्कृतीशी संबंधित असू शकते. ही एक कांस्ययुगीन संस्कृती होती. जी स्मारकीय वास्तुकला आणि उत्साही कलेसाठी ओळखली जाते. मिनोअन राजवाड्यांचे अवशेष हे आजदेखील पर्यटकांचे आकर्षण आहे.
प्राचीन आकृतीचे रहस्य उलगडेना
या आधीही मिनोअन संस्कृतीतील अनेक आकृत्या सापडल्या आहेत. परंतु या आकृतीच नेमकं काय रहस्य आहे हे शास्त्रज्ञांना अजूनही समजलं नाही. याचा आकार हा मोठ्या कारच्या चाकासारखा आहे. एकूण १९ स्क्वेअर फूट मध्ये हि आकृती पसरलेली आहे. या आकृतीचा व्यास १५७ फूट इतका आहे. त्याची बनावट हि मिनोअनच्या थडग्यांसारखी आहे. तसेच या ठिकाणाजवळ प्राचीन काळातील प्राण्यांचे अवशेष आढळून आले आहेत. त्या काळी या ठिकाणी अनेक अनुष्ठान कार्यक्रम होत असावेत. पुरातत्व शास्त्रज्ञ आता या ठिकाणी संशोधन करणार आहेत. हि आकृती पापुरा हिल येथे असून येथे क्रेटच्या आंतराष्ट्रीय विमानतळाचं रडार स्टेशन तयार होणार होतं. २०२७ पर्यंत या विमानतळाचा काम पूर्ण होणार होत. मात्र या ठिकाणी ही प्राचीन आकृती सापडल्याने ग्रीक सरकार आता रडार स्टेशनसाठी नवीन जागा शोधणार आहे.