Kho Kho Championship : खो-खो राज्य अजिंक्यपद स्पर्धा : धाराशिव, पुणे, ठाणे, मुंबईसह यजमान अहिल्यानगरचे संघ बाद फेरीत

62व्या पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत धाराशिव, पुणे, ठाणे, मुंबईसह यजमान अहिल्यानगरचे संघ बाद फेरीत दाखल झाले. रत्नागिरीच्या महिला संघानेही मुंबईवर मात केली.
Kho Kho Championship : खो-खो राज्य अजिंक्यपद स्पर्धा : धाराशिव, पुणे, ठाणे, मुंबईसह यजमान अहिल्यानगरचे संघ बाद फेरीत
Kho Kho Championship : खो-खो राज्य अजिंक्यपद स्पर्धा : धाराशिव, पुणे, ठाणे, मुंबईसह यजमान अहिल्यानगरचे संघ बाद फेरीत
Published on: 
Updated on: 
  • जळगावचा रत्नागिरीवर जादा डावात चार गुणांनी विजय

  • रत्नागिरीच्या महिला संघाने मुंबईला नमवत गाठली बाद फेरी

  • यजमान अहिल्यानगरच्या पुरुष आणि महिला संघांची आगेकूच

Kho Kho Championship : 62 व्या पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी खो-खो स्पर्धेत दुसऱ्या दिवसाअखेर अनेक बलाढ्य संघांनी बाद फेरीत प्रवेश केला. पुरुष गटात धाराशिव, पुणे, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, सांगली, सातारा, सोलापूर, धुळे यांच्यासह यजमान अहिल्यानगरच्या संघांनी आगेकूच केली.

महिला गटातही यजमान अहिल्यानगरसह रत्नागिरीच्या संघाने बाद फेरी गाठली. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर जिल्हा खो-खो असोसिएशनच्या सहकार्याने एकलव्य क्रीडा मंडळातर्फे न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे.

जळगावचा रत्नागिरीवर जादा डावात चार गुणांनी विजय

पुरुषांच्या अ गटात रत्नागिरी आणि जळगाव यांच्यातील सामना चुरशीचा झाला. निर्धारित डावांअखेर दोन्ही संघ 32-32 असे बरोबरीत राहिले. जादा डावात जळगावने 16-12 अशी बाजी मारत चार गुणांनी विजय मिळविला. जळगावकडून मोहित मुंजकरने 12 गुणांची कमाई केली. आर्यन पावरा याने संरक्षणासह सहा गुण मिळविले. रत्नागिरीच्या आदित्य अडावडेने आठ गुण मिळवत झुंज दिली.

सोलापूरने परभणीचा 35-18 असा एक डाव राखून 17 गुणांनी पराभव केला. यजमान अहिल्यानगरने लातूरवर 48-4 असा मोठा विजय मिळविला. त्यानंतर साताऱ्यालाही 37-34 असे नमविले. अहिल्यानगरकडून सुयश क्षीरसागरने 10, तर राज शेटेने आठ गुण मिळविले.

Kho Kho Championship : खो-खो राज्य अजिंक्यपद स्पर्धा : धाराशिव, पुणे, ठाणे, मुंबईसह यजमान अहिल्यानगरचे संघ बाद फेरीत
WWE च्या रे मिस्टेरियोची निवृत्तीची घोषणा; 12 जून 2027 रोजी खेळणार अखेरचा सामना

रत्नागिरीच्या महिला संघाने मुंबईला नमवत गाठली बाद फेरी

महिला गटात रत्नागिरीने पायल पवारच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मुंबईचा 44-30 असा पराभव केला. पायलने 14 गुणांसह 1.55 मिनिटे संरक्षण केले. मुंबई उपनगरने धुळ्याला 33-28 असे नमविले. देविका अहिरे आणि आर्या भाटकर यांनी उपनगरच्या विजयात योगदान दिले.

पुरुष गटात ठाणेने नंदुरबारवर 38-24, तर मुंबईने नाशिकवर 42-26 अशी मात केली. मुंबईकडून प्रतीक घाणेकर आणि हितेश आंग्रे यांनी प्रत्येकी 10 गुण मिळविले. या स्पर्धेचे उद्घाटन पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक नरेंद्र फिरोदिया होते. आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतीताई गाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विविध जिल्ह्यांच्या संघांनी संचलनात सहभाग घेतला.

Kho Kho Championship : खो-खो राज्य अजिंक्यपद स्पर्धा : धाराशिव, पुणे, ठाणे, मुंबईसह यजमान अहिल्यानगरचे संघ बाद फेरीत
Mohammed Shami : मोहम्मद शमीनं घेतली भाजपाध्यक्ष नितीन नवीन यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण! क्रीडा विकासावर झाली चर्चा

बाद फेरीत प्रवेश केलेले संघ

पुरुष गटात पुणे, जळगाव, मुंबई उपनगर, बीड, धाराशिव, रायगड, सांगली, धुळे, ठाणे, नंदुरबार, सोलापूर, परभणी, मुंबई, नाशिक, सातारा आणि अहिल्यानगर यांनी प्रवेश केला. महिला गटात धाराशिव, पालघर, पुणे, रायगड, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सातारा, सांगली, जालना, मुंबई उपनगर, धुळे, रत्नागिरी, मुंबई, सोलापूर आणि अहिल्यानगर हे संघ बाद फेरीत पोहोचले.