Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय फुटबॉल संघाला मोठा धक्का : Aditi Chauhan चा फुटबॉलला अलविदा; १७ वर्षांच्या गौरवशाली कारकिर्दीचा शेवट

भारतीय महिला फुटबॉल संघाची स्टार खेळाडू आणि युरोपमधील पहिली भारतीय महिला खेळाडू अदिती चौहानने फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मिडियाच्या मध्य तिने निवृत्तीची घोषणा केली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 17, 2025 | 09:26 PM
Big blow to Indian football team: Aditi Chauhan bids farewell to football; End of a glorious 17-year career

Big blow to Indian football team: Aditi Chauhan bids farewell to football; End of a glorious 17-year career

Follow Us
Close
Follow Us:

Aditi Chauhan retires from football : भारतीय महिला फुटबॉल संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाची स्टार खेळाडू आणि युरोपमधील पहिली भारतीय महिला खेळाडू, अदिती चौहानने फुटबॉलला अलविदा म्हटले आहे. तिने तिच्या १७ वर्षांच्या कारकिर्दीला थांबा दिला आहे. अदितीने सोशल मीडियावर तिच्या निवृत्तीची घोषणा केली.तिने म्हटले आहे कि, आता तिला मैदानाबाहेर काम करायचे आहे.

गुरुवारी सोशल मीडियावर निवृत्ती जाहीर करताना, ३२ वर्षीय अदिती म्हणाली की तिला आता मैदानाबाहेरून खेळ पुढे नेण्यासाठी काम करायचे आहे. १७ वर्षांच्या दीर्घ आणि प्रेरणादायी कारकिर्दीनंतर माजी भारतीय महिला संघाची ही अनुभवी खेळाडू आता नवीन पिढी घडवण्यासाठी बळकट मार्ग आणि सकारात्मक वातावरण तयार करू इच्छिते.

हेही वाचा : Bangalore stampede : ‘पोलिस RCB च्या नोकरांसारखे वागले..’, कर्नाटक सरकारची उच्च न्यायालयात खळबळजनक माहिती

अदितीकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात अली आहे. त्या तिने लिहिले आहे कि, “मला आकार दिल्याबद्दल, माझी परीक्षा घेतल्याबद्दल आणि मला पुढे नेल्याबद्दल फुटबॉलचे आभार. १७ अविस्मरणीय वर्षांनंतर, मी कृतज्ञता आणि अभिमानाने व्यावसायिक फुटबॉलमधून निवृत्त होत आहे.”

तिने पुढे म्हटले आहे कि, या खेळाने मला फक्त करिअरच नाही तर त्यापेक्षा जास्त काही दिले, त्यामुळे मला एक ओळख मिळाली. दिल्लीत स्वप्नांचा पाठलाग करण्यापासून ते ब्रिटनला पोहोचण्यापर्यंत, ते माझ्यासोबत राहिले. ब्रिटनमध्ये, मी स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये मास्टर्सचे शिक्षण घेतले आणि वेस्ट हॅम युनायटेडकडून खेळली. मी अशा मार्गावर चालत गेली ज्याचा कोणताही स्पष्ट असा नकाशा तयार नव्हता. मला कधीही शिक्षण आणि आवड यापैकी काही एक निवड करावी लागली नाही. मी दोन्ही करण्यासाठी कठोर मेहनत केली आणि या संतुलनाने मला परिभाषित केले आहे.

Football is a game of two halves. I gave it everything in the first half but I’ve still got plenty left in the tank ⚽️♥️ I’m not done yet. pic.twitter.com/T2Bqafrj7T — Aditi Chauhan GK 🇮🇳 (@aditi03chauhan) July 16, 2025

भारताकडून ५७ सामन्यांमध्ये केले प्रतिनिधित्व

अदितीने आपल्या यशस्वी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत, इंग्लंडमधील महिला सुपर लीगसाठी वेस्ट हॅम युनायटेडशी करारबद्ध झाल्यावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तिने ५७ सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि २०१२, २०१६ आणि २०१९ मध्ये SAFF महिला अजिंक्यपद जिंकणाऱ्या वरिष्ठ संघाचा भाग ती राहिली होती.

मी माझ्याकडून या खेळाला सर्वकाही दिले…

अदितीने पुढं सांगितले की, मी खेळाला माझे सर्वस्व दिले आहे. भारतासाठी नंबर वन बनण्याच्या प्रयत्नात सर्वकाही. पण मुख्य आकर्षण म्हणजे पडद्यामागील शांत लढाया. ती म्हणाली की एसीएल दुखापतींमधून परतून, मी इतर खेळाडूंसाठी एक उदाहरण निर्माण केला आहे. की मानसिक धैर्याने कोणीही काहीही मिळवू शकत आणि कशावरही मात करू शकतो.

हेही वाचा : IND Vs ENG : ‘या’ खळाडूंच्या बाद होण्याने इंग्लंडचा सोपा विजय; भारताच्या माजी मुख्य प्रशिक्षकाचे विधान चर्चेत

Web Title: Aditi chauhan bids farewell to football end of a glorious 17 year career

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 09:26 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.