फोटो सौजन्य - सोशल मिडीया
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचे पॅरा खेळाडू दमदार कामगिरी करत आहेत. भारताने पॅरालिम्पिकमध्ये सर्वाधीक पदक टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये जिंकली होती. त्याआधी भारताने १० चा आकडा सुद्धा कधी पार केला नव्हता. यंदा पॅरिसमध्ये भारताने सर्वाधिक ८४ पॅरा खेळाडूंची तुकडी पाठवली होती. यामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग होता. टोकियो पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताने ५ सुवर्ण, ८ रौम्य आणि ६ कांस्यपदक नावावर केले होते. टोकियोमध्ये भारताने १९ पदकांची कमाई केली होती. १९ मेडलसह भारत मेडल टॅलीमध्ये २६ व्या क्रमांकावर राहिला होता. यंदा पॅरिस पॅरालिम्पिकच्या सुरुवातीच्या दिनापासून भारताने दमदार कामगिरी करत टोकियोमधील मेडल टॅलीचा रेकॉर्ड मोडला आहे.
भारताच्या पॅरा खेळाडूंनी सुवर्ण पदकापासून ओपनिंग केली होती. पॅरा शूटिंग भारताची पॅरा शुटर अवनी लेखाराने दमदार कामगिरी करत दुसरे सुवर्ण पदक मिळवले. त्याचबरोबर मोना अग्रवालने कांस्यपदकावर नाव कोरल. नितेश कुमारने अंतिम सामन्यामध्ये अविश्वनीय कामगिरी करत ग्रेट ब्रिटनच्या बॅडमिंटनपटूला पराभूत करून ऐतिहासिक विजय मिळवला. सुहास यथिराजने त्याचे पॅरालिम्पिकमधील दुसरे सिल्वर मेडल मिळवले. भारताच्या युवा पॅरा बॅडमिंटनपटू तुलसीमथी मुरुगेसन आणि मनीषा रामदास यांनी कमालीची कामगिरी करत, सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल नावावर केले.
WE HAVE NOW ACTUALLY SURPASSED TOKYO 🇮🇳
India at Tokyo 2020 – 19 Medals
– 5 GOLD 🥇8 SILVER 🥈6 BRONZE 🥉India at Paris 2024 – 24 medals Till Now
– 5 GOLD 🥇9 SILVER 🥈10 BRONZE 🥉 pic.twitter.com/iKjMiQIJQw— The Khel India (@TheKhelIndia) September 4, 2024
भारताने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सर्वात मोठी तुकडी ॲथलेटिक्सची पाठवली होती. यामध्ये भारताच्या ॲथलेटिक्सने दमदार कामगिरी करत भारताचा तिरंगा पॅरिसमध्ये फडकवला आहे. मेन्स क्लब थ्रोमध्ये भारताने दोन मेडल मिळवले आहे. धरमबिर आणि प्रणव सुरमा यांनी दोन पदक नावावर केले आहेत, तर गोळाफेकमध्ये भारताचा सचिन खिलारीने भारताला ऐतिहासिक ४० वर्षानंतर मेडल मिळवून दिले. निषाद कुमार आणि योगेश कुथिनिया यांनी त्यांचे पॅरालिम्पिकमधील दुसरे सिल्वर मेडल जिंकले. त्याचबरोबर भारताची स्टार तिरंदाजांची जोडीनं शीतल देवी आणि राकेश कुमार यांनी भारताला पॅरिसमध्ये आर्चरीमधून कांस्यपदक मिळवून दिले, तर भारताचा स्टार तिरंदाज हरविंदरने तर कमालचं केली. त्याने दमदार कामगिरी करून भारताला आर्चरीमधून पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले आणि इतिहास रचला.