Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cincinnati Open 2025 मध्ये आर्यना सबालेन्काचा धुमाकूळ! एम्मा रॅडुकानूला पराभूत करत जिंकले विजेतेपद

स्टार टेनिसपटू आर्यना सबालेंकाने सिनसिनाटी ओपन २०२५ मध्ये एम्मा रॅडुकानूला पारभूत करत विजेतेपद पटकावले आहे. सबालेंकाने ३ तास ९ मिनिटे चाललेल्या सामन्यात एम्मा रॅडुकानूला धूळ चारली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 12, 2025 | 02:20 PM
Aryna Sabalenka's shock win at Cincinnati Open 2025! Defeats Emma Raducanu to win the title

Aryna Sabalenka's shock win at Cincinnati Open 2025! Defeats Emma Raducanu to win the title

Follow Us
Close
Follow Us:

Cincinnati Open 2025 : स्टार टेनिसपटू आर्यना सबालेंका हिने सिनसिनाटी ओपन २०२५ मध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सबालेंकाने ३ तास ९ मिनिटे चाललेल्या अटीतटीच्या सामन्यात ब्रिटनच्या एम्मा रॅडुकानूला पराभूत करून विजेतेपदावर नाव कोरले आहे. रॅडुकानूला पुन्हा एकदा सबालेंकाकडून पराभव चाखावा लागला. एकूणच, सबालेंका विरुद्धच्या सलग पराभवांची मालिका तिला आल्यावेळी देखील खंडित करता आली नाही.

राडुकानूने पहिल्या सेटमध्ये शानदार खेळाचे प्रदर्शन करून पहिले नऊ गुण जिंकून जोरदार सुरुवात केली. पण सामना जसजसा पुढे जात राहिला तसतसा तिचा खेळ खालावत गेला. तिची सर्व्हिस कमकुवत व्हायला लागली. त्याच वेळी, सुरुवातीला मागे पडल्यानंतर सबालेंकाने जोरदार मुसंडी मारत टाय-ब्रेकमध्ये पहिला सेट ७-६ (३) असा जिंकला.

हेही वाचा : IPL 2026 च्या मिनी लिलावासाठी आर अश्विनने केली भविष्यवाणी! कोण असणार सर्वात महागडा खेळाडू? हा प्लेयर होणार मालामाल

सामना संघर्षपूर्ण सामन्यांची मेजवानी..

एम्मा रॅडुकानूकडून दुसऱ्या सेटमध्ये जोरदार पुनरागमन बघायला मिळाले. तिने सबालेंकाला मागे टाकत सेट ४-६ असा आपल्या आणावे केला. तिसरा सेट खूप महत्त्वाचा आणि निर्णायक राहिला होता. दोघांनीही आपला सर्वोत्तम खेळ दाखवला. रादुकानुने शक्तिशाली फोरहँड आणि बॅकहँडचा वापर केला आणि साबालेंकाचा हल्ला परतवून लावण्यातही ती यशस्वी ठरली. त्याच वेळी, नंबर वन खेळाडू साबालेंकानेही तिच्या वर्गाने रादुकानुवर आपली पकड अधिक मजबूत केली आणि सेट टायब्रेकरमध्ये ७-६ (५) असा विजय मिळवून विजेतेपदावर आपले नाव कोरले.

सामना जिंकल्याचा आनंद : आर्यना साबालेंका

सिनसिनाटी ओपन २०२५ स्पर्धेचे विजेतेपद जिंकल्यावर साबालेंका म्हणाली की, “मला हा अटीतटीचा सामना जिंकल्याबद्दल खूप आनंद आहे. रादुकानुवर तिसरा सेट जिंकण्यासाठी मला धोकादायक शॉट्सचा वापर करावा लागाल. मला तिच्याविरुद्ध लढण्याचा आनंद मिळत आहे. ती एक अद्भुत अशी खेळाडू तसेच खूप चांगली व्यक्ती आहे. मी तिच्यासाठी खूप आनंदी आहे. तिला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी पाहून मला अधिक आनंद होत आहे. ती खेळात सतत सुधारणा करत असते.”

हेही वाचा : DPL 2025 : सामन्यादरम्यान हर्षित राणासह या 3 खेळाडूंवर ठोठावण्यात आला दंड! प्लेयर्सची चुक पडली महागात

एम्मा रादुकानुला हा सामना जिंकता आला नाही, परंतु तिने तिच्या खेळाने सर्वांना प्रभावित केले आहे. अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर रादुकानुने प्रतिक्रिया देताना म्हटले की, “ती एका कारणास्तव नंबर १ आहे. विम्बल्डनपेक्षा देखील मी तिच्यावर जास्त दबाव टाकला होता. ती माझ्यासाठी समाधानकारक बाब होती. मला नेहमीच वाटायचे की गवत हे माझ्यासाठी अधिक योग्य आहे. मी अजून देखील असेच मानते. म्हणून हार्ड कोर्टवर तिच्यावर दबाव टाकण्याचा मला खूप अभिमान वाटत आहे.

Web Title: Aryna sabalenka defeated emma raducanu at cincinnati open 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2025 | 02:20 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.