
Birthday Special: Deepak Chahar was once compared to 'this' star! Now his career is limited to IPL due to 'this' reason..
चहरने भारतीय संघासाठी पदार्पण करताना प्रभावी कामगिरी केली. यावेळी त्याच्या गोलंदाजीतील विविधता आणि मोठे फटके मारण्याची क्षमता बघून चहरला पंड्याचा पर्याय मानले जाऊ लागले होत. सुरुवातीच्या काळात त्याला भरपूर संधी देखील देण्यात आल्या होत्या. या दरम्यान त्याची कामगिरी समाधानकारक अशी राहिली होती. तसेच त्याचे आपल्या फिटनेसकडे दुर्लक्ष होत होते.
दीपक चहर २०१८ मध्ये पदार्पणापासून, त्याला दुखापतीमुळे अनेक वेळा राष्ट्रीय संघातून बाहेर जावे लागेल. त्याच वेळी, तो अनेक वेळा दुखापतीमुळे आयपीएलच्या संपूर्ण हंगामातून देखील बाहेर राहिला आहे. दीपक हा एकदिवसीय आणि टी२० चा चांगला खेळाडू मानला जातो, परंतु संघात स्थान मिळविण्यासाठी खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा सुरु आहे. दीपकला शेवटची संधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी मिळाली होती. तथापि, त्याने वैयक्तिक कारणांमुळे या मालिकेतून माघार घेतली होती. तेव्हापासून तो संघात अद्याप परतला नाही.
दीपक दुखापतीमुळे आयपीएल २०२२ मधून बाहेर झाला होता. त्याच वेळी, खराब तंदुरुस्तीमुळे तो २०२३ आणि २०२४ चा संपूर्ण हंगामात त्याला खेळता आले नाही. सीएसकेने त्याला २०२५ पूर्वी सोडले होते. २०२५ मध्ये, तो हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सकडून देखील खेळला आहे. दीपक चहर हा गोलंदाजीमध्ये विविधतेसाठी प्रसिद्ध आहे. यामुळेच तो अनेकदा सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट घेण्यात यशस्वी ठरतो. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि आयपीएलमध्ये सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट घेण्याची क्षमता दाखवून दिली आहे. यामुळेच तो बराच काळ आयपीएलमध्ये सीएसकेच्या वेगवान गोलंदाजीचा मुख्य कणा मानला जात होता.
हेही वाचा : ना पंत ना राहुल! Asia Cup 2025 साठी यष्टीरक्षक म्हणून ‘हा’ खेळाडू निवडकर्त्यांची खास पसंती..
३२ वर्षीय चहरने १३ एकदिवसीय सामन्यांमध्ये १६ बळी टिपले आहेत आणि २ अर्धशतकांसह २०३ धावा देखील केल्या आहेत. त्याच वेळी, त्याने २५ टी-२० सामन्यांमध्ये ३१ बळी मिळवले आहेत. त्याच वेळी, दीपकने २०१६ ते २०२५ दरम्यान ९५ आयपीएल सामन्यांमध्ये ८८ विकेट्स घेतल्या आहेत.