-पुणे’ज कॉर्पोरेट क्लॅश क्रिकेट लीग (फोटो- सोशल मिडिया)
युबीएस : २० षटकांत ५ बाद १७६ धावा (संदीप देवल ४६ (१९ चेंडू, ४ चौकार, ४ षटकार), प्रवीण सिंग नाबाद २४, जी. मुरली कार्तिक २४, हरप्रीत सिंग १९, सागर घरू नाबाद १८, उत्कर्ष सिन्हा १-१३, दीपक कौल १-१७) वि.वि. बार्कलेज : १९.२ षटकांत सर्व बाद १५८ धावा (अभिषेक झा ४६ (४४ चेंडू, ५ चौकार, २ षटकार), शिवाजी अंकीपल्ली २७ (४ चौकार, १ षटकार), अजिंक्य २०, संदीप देवल ३-२०, प्रितेश मालवीया २-३१). सामनावीर : संदीप देवल. युबीएस १८ धावांनी विजयी.
याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्चा थरारक विजय
किर्लोस्कर ब्रदर्स : २० षटकांत सर्व बाद १२० धावा (विश्वनाथ सुतार २८, संतोष दिघे २२, प्रितेश पटेल १६, प्रेमजीत पाटील ३-२३, भूषण तांदळे २-२९, उद्धव थिटे १-१४) पराभूत वि. स्प्रिंगर नेचर : १५.५ षटकांत ३ बाद १२४ धावा (उद्धव थिटे ४१ (३१ चेंडू, ६ चौकार, १ षटकार), पियुष पाटील नाबाद ३०, जयप्रकाश शिरोळे १८, अजय पऱ्हाळकर नाबाद १३, राहुल मोरबाळे २-२४). सामनावीर : उद्धव थिटे. स्प्रिंगर नेचर ७ गडी राखून विजयी.
‘रायझिंग स्टार ब्ल्यू’ चा दणदणीत पराक्रम
रायझिंग स्टार स्पोर्ट्स तर्फे आयोजित ‘रायझिंग स्टार करंडक’ प्रौढ गटाच्या (५० वर्षावरील) टी-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेत रायझिंग स्टार ब्ल्यु संघाने रायझिंग स्टार रेड संघापेक्षा उत्तम सरासरी धावगती राखत स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. येवलेवाडी येथील ब्रिलीयंट्स स्पोर्ट्स ॲकॅडमी येथे झालेल्या या स्पर्धेत धीरज कुमार याने फटकावलेल्या ८० धावांच्या जोरावर रायझिंग स्टार ब्ल्यु संघाने रायझिंग स्टार यलो संघाचा ४१ धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला.
किती छळाल त्या बिचाऱ्याला! आज Vaibhav Suryavanshi ला संधी देणार का? संघ व्यवस्थापन नक्की करतंय काय?
पहिल्यांदा खेळणाऱ्या रायझिंग स्टार ब्ल्यु संघाने १९१ धावांचे लक्ष्य उभे केले. धीरज कुमार याने ५१ चेंडूत ८ चौकार आणि ५ षटकारांसह ८० धावांची खेळी केली. निलेश सामंत याने ३८ धावांची खेळी केली. या लक्ष्याचा पाठलाग करताना रायझिंग स्टार यलो संघाचा डाव १५० धावांवर मर्यादित राहीला.






