Former Pakistani bowler in trouble: 'These' are serious allegations against Wasim Akram, complaint filed
Case filed against former Pakistani cricketer Wasim Akram : माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम सद्या चांगलाच चर्चेत आला आहे. यामागील कारण म्हणजे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. लाहोरमधील राष्ट्रीय सायबर गुन्हे अन्वेषण एजन्सी मध्ये त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली गेली आहे. यामध्ये वसीम अक्रमवर ऑनलाइन जुगार आणि बेटिंग प्लॅटफॉर्म बाजीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केल्याचे दिसत आहे.
वसिम अक्रमवर केलेले हे सर्व आरोप मुहम्मद फैज नावाच्या व्यक्तीकडून करण्यात आले आहे. त्याने वसीमविरुद्ध एक याचिका दाखल केली असून ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक गुन्हे कायदा २०१६ अंतर्गत अक्रमविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा : Asia cup 2025 : ‘हे एक मोठे आश्चर्य..’ श्रेयस अय्यरला डावलल्याने भारताचा माजी कर्णधार नाराज..
नेमकं प्रकरण काय?
तक्रारदाराने वसीम अक्रमवर परदेशी बेटिंग अॅपचा प्रचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. वसीम अक्रमने या अॅपसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून काम पाहिले आहे. त्याच वेळी, त्याच्याकडून त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याचा प्रचार देखील करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या मते, वसीम अक्रमने व्हिडिओ आणि पोस्टरद्वारे या प्लॅटफॉर्मला पाठिंबा दिला असून ज्यामध्ये तो लोकांना त्यात सामील होण्यासाठी प्रोत्साहित करत असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानमध्ये सट्टेबाजीवर बंदी
इस्लामिक राष्ट्र पाकिस्तानमध्ये या प्रकारच्या जाहिरातीला बेकायदेशीर मानण्यात आले आहे. तेथे जुगार, सट्टेबाजी यासारख्या ऑनलाइन गेमवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. तक्रारदार मुहम्मद फैज यांनी म्हटले की “अशा प्रकारच्या क्रियाकलापांमुळे सामान्य लोकांची, विशेषतः तरुणांची या अॅपबद्दलची आवड वाढत असून हे पाकिस्तानच्या कायदेशीर आणि नैतिक मूल्यांच्या विरुद्ध जाणारे आहे.”
हेही वाचा : Asia cup 2025 : भारतीय संघ नव्या ‘शुभ’ मनाच्या दिशेने; मिस्टर 360 चे कर्णधारपद तात्पुरते? बीसीसीआयकडून इशारा
तक्रारदाराचे विधान मीडिया रिपोर्ट्समध्ये आले असून त्यात त्याने म्हटले आहे की “सोशल मीडियावर दिसणाऱ्या पोस्टर आणि व्हिडिओ क्लिपमध्ये वसीम अक्रम ऑनलाइन प्लॅटफॉर्मला पाठिंबा देताना दाखवण्यात आले आहे. या अॅपमुळे सामान्य लोकांमध्ये आवड वाढत आहे.” यासोबतच, तक्रारदाराने इलेक्ट्रॉनिक गुन्हे कायदा २०१६ अंतर्गत वसीम अक्रमवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी विनंती देखील करण्यात आली आहे. जेणेकरून भविष्यात कोणताही स्टार अशी कृती करणार नाही.
वसीम अक्रम जगातील दिग्गज वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने पाकिस्तानसाठी एकूण १०४ कसोटी आणि ३५६ एकदिवसीय सामने खेळलेले असून अक्रमने कसोटीत एकूण ४१४ बळी टिपले आहेत. तर, एकदिवसीय सामन्यात त्याने ५०२ बळी घेतेल आहेत.