Divorce News: भारतीय क्रिकेटचा हुकूमी स्पिनर गोलंदाज युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा आज दोघेही कायदेशीररित्या वेगळे होणार आहे. त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. अखेर आज ते दोघेही घटस्फोट घेणार आहेत. दोघेही थोड्याच वेळात कौटुंबिक कोर्टात दाखल होणार आहेत. भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा या आज कागदोपत्री वेगळे होणार आहेत. बांद्रा येथील कोर्टात ते दोघेही लवकरच अंतिम सुनावणीसाठी पोचणार आहेत.
बांद्रा कोर्टात सुनावणी झाल्यानंतर ते औपचारिकरित्या वेगळे होणार आहेत. त्या दोघांच्या घटस्फोटाबद्दल अनेक दिवस चर्चा सुरू होत्या. अखेर त्या चर्चा आज खऱ्या ठरल्या आहेत. युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांना आज कोर्टात सुनावणीसाठी बोलावण्यात आले आहे.
22 डिसेंबर 2020 मध्ये युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा विवाह झाला होता. धनश्री वर्मा ही एक डान्सर आणि कंटेंट रायटर आहे. युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा या दोघांचे रील्स, व्हिडिओ नेहमी सोशल मिडियावर व्हायरल होत असत. मात्र गेल्या वर्षभरापासून त्या दोघांमध्ये काही ठीक नसल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्या चर्चा खरया ठरल्या आहेत. आज दोघेही कायदेशीररित्या वेगळे होणार आहेत.
इंटरेस्टिंग होती चहल-धनश्रीची लव्ह स्टोरी
युझवेंद्र चहलची प्रेमकहाणी खूपच रंजक होती. दोघांची भेट कोविडदरम्यान एका डान्स क्लासदरम्यान झाली होती. यानंतर दोघेही काही काळ एकमेकांना डेट करत होते. 2020 मध्ये लग्न झाले. गेल्या 4 वर्षात चहल आणि धनश्रीमध्ये खूप प्रेम पाहायला मिळाले. ते अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले. तर अनेकदा धनश्रीचे नाव वेगवेगळ्या क्रिकेटर आणि सेलिब्रिटींबरोबर जोडण्यात आले तरीही युझवेंद्रने तिची साथ सोडली नाही. श्रेयस अय्यर, प्रतीक उतेकर यांच्यासह धनश्रीने अनेक फोटोही व्हायरल झाले आहेत. इतकंच नाही तर धनश्रीच्या आजारपणातही युझवेंद्रने तिची साथ सोडली नाही आणि धनश्रीनेही युझवेंद्रच्या पडत्या काळात त्याला साथ दिली होती.
वास्तविक, क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या अफवा सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांपासून पसरत होत्या. आता,या जोडप्याच्या विभक्त होण्याच्या अफवा खऱ्या आहेत. घटस्फोटाची पुष्टी झाली आहे आणि काही काळानंतर ते अधिकृत होईल. मात्र, घटस्फोटाची प्रक्रिया होणे बाकी आहे. आज ते दोघेही बांद्रा येथील कौटुंबिक कोर्टात हजर राहणार आहेत. त्यांच्या विभक्त होण्यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही, परंतु हे निश्चित आहे की या जोडप्याने त्यांचे जीवन वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे.