World Chess Competition 2024: भारताने बुद्धिबळ स्पर्धेत मोठे यश पटकावले आहे. भारताच्या डी. गुकेश याने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले आहे. डी. गुकेश हा जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता ठरला आहे. डी. गुकेशने हा विजय प्राप्त करून भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. डी. गुकेशने जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत विश्वविजेता ठरला आहे.
भारताचा बुद्धिबळपटू डी. गुकेशने चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेनचा या स्पर्धेत पराभव केला आहे. विश्वनाथन आनंद यांच्यानंतर डी. गुकेश हा भारताचा दुसरा विश्वविजेता ठरला आहे. भारतासाठी हा अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. १८ वर्षीय गुकेशने अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत जगज्जेता ठरला आहे. वयाच्या 18 व्या वर्षी विश्वविजेता ठरण्याचा विक्रम डी. गुकेशने रचला केला आहे.
डी. गुकेश आणि चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेन यांच्यात फायनल सुरू होती. त्यातील 13 डावांपैकी पहिला डाव हा डिंग लिरेन याने जिंकला होता. त्यानंतर तिसरा डाव जिंकून गुकेशने बरोबरी केली. त्यानंतर दोन्ही ग्रँडमास्टर्सनी सलग सात डाव बरोबरीत सोडवले होते. 11 व्या डाव्यात गुकेशने बरोबरी सोडवत विजयाचा मार्ग मोकळा केला. मात्र 12 व्या डावात लिरेन जिंकला. अखेर 13 व्या डावात हा सामना टायब्रेकरकडे जाणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले होते. मात्र अखेरीस डी. गुकेशने विश्वविजेता होण्याचा विक्रम रचला आहे.
https://x.com/Prasang_/status/1867199305993650427?t=CbNq5Zo9JioWa07oP53jAg&s=08
चेस ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताचाच डंका
सध्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा २०२४ सुरू आहे. यामध्ये भारताने मोठा इतिहास घडवला आहे. भारताचा बुद्धिबळपटू डी. गुकेश याने बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ स्पर्धेत इतिहास रचला आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जबरदस्त खेळ करत त्याने भारताला सुवर्णपदक जिंकवून दिले आहे. ४५ व्या ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या डी. गुकेशने संपूर्ण विश्वात सर्वोत्तम कामगिरीने भारताचे नाव मोठे केले.
बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या १० व्या फेरीमध्ये भारतीय खेळाडूंनी अमेरिकेचा २.५ – १.५ असा पराभव केला व सुवर्णपदक पटकावले. डी गुकेशने अमेरिकेच्या फॅबियानो कारूआना याचा पराभव केला. डी. गुकेशने या स्पर्धेत एकूण ८ सामने जिंकले तर २ सामने ड्रॉ केले. संपूर्ण स्पर्धेत गुकेशने आणि अन्य खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून देशाला सुवर्णपदकाची कमाई करून दिली.
बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ स्पर्धेत खुल्या गटामध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. भारतीय संघात डी. गुकेश, आर प्रज्ञानंद, अर्जुन इरीगसी, विदित गुजराथी, पेंटाला हरिकृष्ण, आणि श्रीनाथ नारायणन यांचा समावेश आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या चीनला अमेरिकेविरुद्ध दोन गुणांचा फटका बसला. त्यानंतर भारताने चमकदार कामगिरी करून सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत प्रत्येक फेरीत दोन संघ एकमेकांविरुद्ध लढत देतात. एका संघाने फेरी जिंकल्यास त्याला दोन गुण मिळतात.